* प्रेरणा *
हाताच्या बोटांवर धरती ताल अलौकिक बोटे...
गूढ शब्द ओठांवर गाती - गण गण गणांत बोते !
अंगावरती कोणी वेडा
दिशा नेसला होता
शेगावाला प्रकट जाहला
पान खरकटे खाता
आकाशाची पत्रावळ अन् नक्षत्रांचे उष्टे..
गूढ शब्द ओठांवर गाती - गण गण गणांत बोते !
......
श्री संत गजानन महाराज यांचे चरणी ..