* परिचय *
नाव : वासुदेव नरहर सरदेसाई जन्मतारीख : ६ मार्च १९३७
गाव : मोर्डे. ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी जन्मगाव : कान्हे, ता.चिपळूण,जि.रत्नागिरी
शिक्षण : एफवायबीए (युनि.गुजराथ)१९५७.
काव्य
- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळातर्फे(पुणे) 'माझी कविता' हा कवितासंग्रह प्रसिद्ध १९८४.
- पहिला गझलसंग्रह 'आभाळ्पंख' प्रकाशित-२००१.(इंद्रनील प्रकाशन,मुंबई--२.)
- दुसरा गझलसंग्रह 'चांदण्याची तोरणे' प्रकाशित-२००३.(इंद्रनील प्रकाशन,मुंबई--२.)
- || अंगाई ते गझल-रुबाई || - समग्र वा. न. सरदेसाई , ह्या काव्यसंग्रहातील 'काव्य प्रवासा' मध्ये सविस्तर ओळख.
- खुल्या कव्यलेखन - स्पर्धांतून अनेक विशेष पारितोषिके...
उल्लेखनीय
- 'आचार्य अत्रे स्मृति कथा-कविता स्पर्धा - नवयुग १९७०' ह्या तेव्हाच्या भव्यतम खुल्या स्पर्धेत सुमारे पंधराशे कवितामधून ' इंगित' ह्या कवितेला प्रथम पारितोषिक/ लघुकथेलाही पुरस्कार.
- 'अक्षर दिवाळी' १९८६ च्या अंकात कवितेला(गझल) गौरवपूर्ण प्रसिद्धी... तीनशे दिवाळी अंकांतील निवडक तेरा कवितांमध्ये समावेश.
- 'सुवार्ता' (वसई)१९८५ च्या विशेषांकात काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
- 'आम्ही पार्लेकर' २००७ दिवाळी-अंकात कविता-लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
- दिवाळी-अंक ,विशेषांक ह्यांमधून प्रामुख्याने गझल-कविता लेखन.
नाटक
- ' 'रंगश्री' ' नाटयमंडळाची शहादा(जि.धुळे) येथे स्थापना. सुमारे चाळीस सुविहित प्रयोग.
- महा. राज्य नाटय-स्पर्धेत- '-त्याची वंदावी पाउले' ह्या नाटकाला पारितोषिक... लेखन, दिग्दर्शन, भूमिका, केंद्र जळ्गाव/१९७१.आ
- मी लिहिलेली अन्य नाटके : 'माता न तू वैरिणी,' 'शू~~! शूटिंग चालु आहे..' आणि 'माती गाते गीत आपुले' (तिन्ही अप्रकाशित. पहिली दोन रंगभूमीवर)
- 'आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय' ह्या बाल नाटयाचे (बॅले) लखन. 'नाटय-दर्पणचा प्रथम पुरस्कार.. संस्था : लिटिल् थिएटर मुंबई.. रंगभूमीवर अनेक प्रयोग. टीव्हीवर.
- दुसरे बालनाटय 'को जागर्ति?' संस्था : लिटिल् थिएटर मुंबई.. रंगभूमीवर / टीव्हीवर.
- बालनाटय, लोकनाटय : लेखन-पुरस्कार, शिबिर-शिक्षण.
आकाशवाणी/टीव्ही.. इतर
- आकाशवाणीचा मान्याताप्राप्त कवी AIR-65.
- आकाशवाणीचा 'बी' हायग्रेड ड्रामा आर्टिस्ट.
- टीव्हीवर काव्यवाचन, गझल (कॅसेट- BMG-crescendo)
- अ. भा. मराठी गझल संमेलनांत (मुंबई, नासिक, अमरावती आणि औरंगाबाद) सहभाग.
- संगीत, चित्रकला ह्यांची मनापासून आवड.