Currently browsing

Page 29

श्री.रविंद्र कांबळे – नांदगाव, नासिक

प्रति श्री.वा.न.सरदेसाई सस्नेह नमस्कार आपल्या मैफलितल्या कविता आवर्जून वाचणारा मी एक. अता मगेच आपली ‘अयुष्य’ ही गझल वाचली. गझल फारच आवडली म्हणून हा पत्रप्रपंच . आपल्या काव्यप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा ! आपला रविंद्र कांबळे  

श्री.देवरे दगा दोधू , मु.पो.म्हसदी , ता.साक्री , जि.धुळे – दिनांक २८/०७/२०१२

श्री.वा.न.सरदेसाई यांना , देवरेदगाचा सप्रेम नमस्कार पत्रास कारण  की मी लोकमत पेपरातील ‘साहित्यजत्रा ‘ या पुरवणीतील ‘ चंद्र रात्रीला जरा देऊन जा ‘ही कविता वाचली व ती मला खूप आवडली . मलासुद्धा तुमच्यासारखी कविता लिहावी असे वाटते. आपला देवरे दगा दोधू

श्री.भालचंद्र पाठक – ( M.A.,M.Ed.) – बेटावद ता.शिंदखेडे -दिनांक

सन्मित्रप्रवर श्री. वा.न.सप्रेम नमस्कार वि.वि. नुकतंच तुम्ही सादर केलेलं ‘ पानवलकर’ सरांचे व्यक्तिचित्रण तुमच्याच मुखातून ऐकलं . लेखन सरस की निवेदन ? असा संभ्रम पडावा इतकं सुंदर . भाषा सरळ , अनलंकृत आणि विशेष म्हणजे विलक्षण  ओघवती. फारच सुंदर . ऐकतांना क्वचित कुठे  प. लं चे  ‘रावसाहेब ‘ डोकावतात असं वाटून गेलं अतिशय परिणामकारक वाणी-लेखणीचा मास्टरपीस ऐकल्याच समाधान वाटल . मागील  श्रुंखला नभोनाटयातलं लेखन कौशल्य  अप्रतीम . ती idea खूप  नवीन होती . आकाशवाणी काहीवेळा मोठ्या हिमतीनं चांगले कार्यक्रम सादर करतांना दिसते. पुनश्च अभिनंदन ! आपला …

श्री. सुरेश पाचकवडे (कवी )- अकोला – दिनांक २६/१२/१९९१

आदरणीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. ‘अनुराधा ‘ दिवाळीअंकातील ‘ तिमिरात कोरले मी ‘ ही सुंदर कविता वाचली आणि भारावून गेलो. आपल्या लेखणीतील गोडवा , अंतःकरणाला रुजला. मन फुलून गेलं. आपली प्रतिभा प्रेशंसनीय तर आहेअ शिवाय , माझ्या साहित्याला प्रेरकही आहे. तसं पाहिलं तर मी तुम्हाला परिचित नाही परंतु  आपलं साहित्य मी अधुनमधुन वाचत असतो. आपल्या साहित्याचा परिचय मला आहे. आपला सुरेश पाचकवडे (कवी )

सौ.विजया जहागीरदार ( विवेक साप्ताहिक जा.क्र.७७१ )- मुंबई- दिनांक १९८५

श्री.वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. तुमची कथा दिवाळीसाठी घेतली असून दोन्ही बालकविताही छान आहेत. तुमच्या बालकविता मला आवडतात . विषय वेगळा असतो. त्याही स्वीकृत. कळावे. स्नेहशील सौ.विजया जहागीरदार -विवेक साप्ताहिक