Currently browsing

Page 28

आपण मोठ्ठे व्हायचं . .

आईबाबांसारखे आपणे मोठ्ठे होऊ स्कूटरवरून भुर्रकन् शाळेला जाऊ . .   अंगावरती झेलायच्या ओल्या ओल्या सरी नाचायचं हं, पावसात मोट्ठे असलो तरी. …

श्री.रमेश करमरकर – अमळनेर – दिनंक २७/०४/१९८०

श्री. बबनराव यांसी स.न.वि.वि. ‘ किरण घरातील तिन्ही सांजा ‘ हे तू लिहिलेले नभोनाट्य जळगांव आकाशवाणीकेंद्रावर आत्ताच ऐकले आणि लगेच तुला पत्र लिहिण्यास घेतले. भाषेच्या बाबतीत प्रश्नच नाही. ‘गरूड’ कल्पना फारच छान ! आपला रमेश करमरकर

श्री. पु. ल. देशपांडे – पुणे – दिनांक ०३/०३/१९९४

सप्रेम  नमस्कार आपलं पत्र मिळाल. इतक्या आपुलकीने पत्र पाठवून माझ्याविषयीच्या  सद्भावना व्यक्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . आपल्या चारही कविता आवडल्या.  मातीचं गाण (रानरंग ) कविता विशेष आवडली. आपला पु. ल. देशपांडे मूळ पत्र_ श्री. पु. ल. देशपांडे  

श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक १२.०३.२००२

सहृदयी श्री. वा.न.सरदेसाई . . . . ” गझलच्या प्रांतात आभाळपंखद्वारे तुम्ही हस्ताक्षर केले आहे . याचा उल्लेख इतिहासात होत राहील . जे कधी न जमले मजला ही अप्रतीम गझल आहे. मला खालील छंदामधून दोनदोन ओळींची मार्मिक  उदाहरणे हवी आहेत . त्या छंदापैकी एका उदाहरणासाठी पापणी  भिजू नये असे रडून घेतले , आसवांमधून मी कधी हसून घेतले ,ची नोंद घेत आहे. आपला आनंदकुमार आडे  

श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक ०३/०६/२००२

प्रति श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. आपले दिनांक २४/०५/२००२ चे पोस्टकार्ड पत्र व  दिनांक २७/०५/२००२ चे कव्हरपत्र मिळाले.  फारफार सुखावलो. आपण पाठविलेल्या १८ छंदांवरील छंदोबद्ध मतलांची  उदाहरणे मिळाली . आपला मी हृदयपूर्वक आभारी आहे. सर्व मतले दर्जेदार A-One आहेत. आतामी त्यांना व्यवस्थीतपणे record करतो.  पुस्तकात नोंद घेतो . अजूनकाही लागले तर  पत्राने अवश्य कळवतो. आपण दिलेल्या सहकाराबद्द्ल मी आपला आभारी आहे. आपला आनंदकुमार आडे

श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६

श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६ मित्रवर्य श्री. वासुदेवराव स.न. सुंदर हस्ताक्षरातील आपले पत्र मिळाले .  सुवासिक आठवणीप्रमाणे ते जपून ठेवले . प्रेमादरापोटी आपण माझ्यातील लेखकाचे / माझ्या लेखाचे कौतुक केले . “भालचंद्र”ह्या दिवाळीअंकात आपण रामरक्षेवर लिहिले आहे. अजून वाचतोय. रामरक्षेचा भावानुवाद प्रसादिक …

श्री.यशवंत देव – मुंबई -दिनांक ०६/०७/१९९२

श्री. वा.न.सरदेसाई यांना सप्रेम नमस्कर …..   तुम्ही लिहिलेले एकगीत गोमू आकाश झालंया जागं ! जाऊ होरीत बसून दोगं ! तुम्हाला माहीअच आहे ! त्याच पद्धतीची आणखी ५/६ कोळीगीतं तुम्ही लिहून पाठवाल का ? क्यसेटसाठी हवी आहेत . अजून प्रपोजल कच्चेच आहे परंतु मी प्रयत्नात आहे थेंब लाटेचं उरती निलं , तुज्या येणीला आयती फुलं  या फार कल्पनारम्य ओळी आहेत. यी गीताला चाल लागली आहे. म्हणूनअ हे विनंतीवजा पत्र. द्वंद्वगीतं , समूहगीतं सुद्धा असू देत. चालेल. मात्र , कोळी, मासे , समुद्र , सण इतक्यतच काहीही लिहा. आपला यशवंत देव    

श्री.नन्दा आचरेकर , लालबाग, मुंबई -दिनांक ०४/१०/१९८७

प्रति श्री.वा.न.सरदेसाई यांस स.न. आपण लिहिलेल्या ४ ऑक्टोंबरच्या रविवार सकाळमधील  “गाणे” ही गझल वाचली. अर्थातच आवडलीही.  अशाच उत्तमोत्तम गझला आपल्याकडून लिहिल्याजाव्यात हीच आई जगदम्बेचरणी प्रार्थना . गझल कशी लिहावी ह्या संदर्भात आपणाकडून काही माहिती मिळू शकेल …

श्री. प्र.भा.पाठक – धुळे – दिनांक १३/०८/१९८५

श्री.रा.रा.सरदेसाई साहेब यांस तुम्ही लिहिलेले नभोनाट्य “तू जरा उशिरानेच मावळलास “ जळगाव आकाशवाणीवर ऐकले . एकदम मस्त होते. त्यानंतर रविवारच्या लोकसत्तामथील तुमचे छोट्यांसाठीचे  पाउसगाणेही वाचायला मिळाले. तेही छान होते. परवा  रविवारच्या  महराष्ट्रटाईम्स मथे ” सत्तावीस वजा नऊ “  हा लेख वाचला. खूप आवडला. त्यातील यमके ,प्रास वगैरे मस्त जमले आहे. हल्लीच्या पद्यतही नुसते गद्यच असते, पद्य ओषधालाही नसते. याउलट तुमचा गद्यलेख मात्र पद्यमय होता , काव्यमय होता. आपला प्र.भा.पाठक

सौ.सुजाता जाधव – अंधेरी , मुंबई – दिनांक ०६/११/१९९२

श्री.सरदेसाई यांस स.न.वि.वि. आपले माती माझे कुळ , विट्ठलाचे नाम सोप्याहून सोपे आणि अंधाराची आली पाउले श्रवणी हे तीन अभंग १९७८ च्या   ज्ञानदूत ह्या मराठी दिवाळीअंकात मला मिळाले. त्याचवेळी मी त्यांना चाली लावल्या म्हणजे १३ वर्षांपूर्वी  लावलेल्या चाली आहेत. हे अभंग माझ्या मुली ज्ञानदीपमधे अनेकवेळा गायल्या. अनकांना आपले अभंग अतिशय आवडले . चालीही आवडल्या. आपली नम्र सौ.सुजाता  जाधव  

श्री. सुमेध वडावाला – विलेपार्ले – दिनांक.२१/१०/१९९४

माननीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. मुबई तरूणभारत दिवाळीसाठी आपण पाठविलेली गझल ‘जग’ सुरेख आहे. अर्थघन आहे. ऐकेक दिस येथे मोजून काढला मी आता जगायचे जे ते मोजकेच आहे ! ह्या ओळीही सुंदर ! आपला सुमेध वडावाला

श्री.यशवंत पारखी – (कवी) -डोंबिवली- दिनांक ०९/११/१९९४

कविमित्र , श्री. वा.न.सरदेसाई यांसी सप्रेम नमस्कार वि.वि. मध्यंतरी दूरदर्शनवर तुमचे नांव वाचले होते शिवाय कवितार्तीत तुमची कविता वाचली . इथे एका कवितांच्या मैफलीत तुमची  एक गझल नवोदित गायकाने सादर केली होती. त्याचा तुमचा परिचय नव्हता. नंतर मीच सर्वांना तुमच्याबद्दल सांगितले. आपला यशवंत पारखी

श्री.वसन्त जोशी (लेखक ) – कर्जत – दिनांक २३/०२/१९७१

प्रिय श्री सरदेसाई , सादर नमस्ते आपले १०.१२.१९७० चे नवयुगच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘वासना’ या कथेबद्दल माझे अभिनंदन करणारे पोस्टकार्ड नवयुगच्या संपादकांकडून Redirect होउन परवा मिळले. काहीही परिचय नसतांना आपण अगत्याने पत्र पाठवून कथा वाचल्याचे व आवडल्याचे कळविलेत याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्यासारख्या रसिक वाचकांकडून जेव्हा अशी कैतुकाची पत्रे येतात तेव्हा कसा व किती आनंद होतो म्हणून सांगू ? कारण शेवटी मी तुमच्यासारख्या वाचकांनाच खरे न्यायाधीश मानतो . अस्तु. आपला स्नेहांकित वसन्त जोशी

सौ.मंदा देशपांडे -जळगाव -दिनांक १२/०४/१९८९

श्री. वा.न.सरदेसाई स.न. मी आपले ‘ माझा संसारी भगवान ‘ हे गीत आकाशवाणीच्या सुगमसंगित या कार्यक्रमात गायिले आहे . त्याला स्वरसाज श्री. पुराणीकसर (माझे गुरुवर्य ) यांनी दिलेला आहे. हे गीत ता.०२/०५/१९८९ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रसारीत होणार आहे. आपले ‘ व्रम्हा विष्णू अणि शिवाचा एकरूप ओंकार ” हे ही गीत माझ्या  भावगंध या कार्यक्रमात समूहस्वरात नेहमीच सादर करते. आपली अन्य काही गेयगीते असतील तर जरूर पाठविणे. आपली नम्र सै.मंदा देशपांडे