Currently browsing

Page 27

घाई करतायत

घाई करतायत फुलं प्राजक्ताची अंगणात सडा टाकण्याची .

निळी डोळ्यांची पालखी . .

लाजरीच्या पानातली हिर्वी पदर – ओढणी निळी डोळ्यांची पालखी माझ्या सजणीला आणी . .   किलकिलते पडदे तशा पापण्या मख्मली येता वेशीशी …

अनंताचे वेड . .

पावलांनी माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी . .   तेजाला कोंडले माझ्या पापणीत वारियाचे वेग ठेविले मुठीत . .   …

एकटीचा खेळ . .

– मी एकटी असली म्हणजे सांगू कोणता खेळ खेळते . . ?   बाबांची चप्पल हळूचकन् मी माझ्या पायात घालते !   …

आपण मोठ्ठे व्हायचं . .

आईबाबांसारखे आपणे मोठ्ठे होऊ स्कूटरवरून भुर्रकन् शाळेला जाऊ . .   अंगावरती झेलायच्या ओल्या ओल्या सरी नाचायचं हं, पावसात मोट्ठे असलो तरी. …

श्री.रमेश करमरकर – अमळनेर – दिनंक २७/०४/१९८०

श्री. बबनराव यांसी स.न.वि.वि. ‘ किरण घरातील तिन्ही सांजा ‘ हे तू लिहिलेले नभोनाट्य जळगांव आकाशवाणीकेंद्रावर आत्ताच ऐकले आणि लगेच तुला पत्र लिहिण्यास घेतले. भाषेच्या बाबतीत प्रश्नच नाही. ‘गरूड’ कल्पना फारच छान ! आपला रमेश करमरकर

श्री. पु. ल. देशपांडे – पुणे – दिनांक ०३/०३/१९९४

सप्रेम  नमस्कार आपलं पत्र मिळाल. इतक्या आपुलकीने पत्र पाठवून माझ्याविषयीच्या  सद्भावना व्यक्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . आपल्या चारही कविता आवडल्या.  मातीचं गाण (रानरंग ) कविता विशेष आवडली. आपला पु. ल. देशपांडे मूळ पत्र_ श्री. पु. ल. देशपांडे  

श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक १२.०३.२००२

सहृदयी श्री. वा.न.सरदेसाई . . . . ” गझलच्या प्रांतात आभाळपंखद्वारे तुम्ही हस्ताक्षर केले आहे . याचा उल्लेख इतिहासात होत राहील . जे कधी न जमले मजला ही अप्रतीम गझल आहे. मला खालील छंदामधून दोनदोन ओळींची मार्मिक  उदाहरणे हवी आहेत . त्या छंदापैकी एका उदाहरणासाठी पापणी  भिजू नये असे रडून घेतले , आसवांमधून मी कधी हसून घेतले ,ची नोंद घेत आहे. आपला आनंदकुमार आडे  

श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक ०३/०६/२००२

प्रति श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. आपले दिनांक २४/०५/२००२ चे पोस्टकार्ड पत्र व  दिनांक २७/०५/२००२ चे कव्हरपत्र मिळाले.  फारफार सुखावलो. आपण पाठविलेल्या १८ छंदांवरील छंदोबद्ध मतलांची  उदाहरणे मिळाली . आपला मी हृदयपूर्वक आभारी आहे. सर्व मतले दर्जेदार A-One आहेत. आतामी त्यांना व्यवस्थीतपणे record करतो.  पुस्तकात नोंद घेतो . अजूनकाही लागले तर  पत्राने अवश्य कळवतो. आपण दिलेल्या सहकाराबद्द्ल मी आपला आभारी आहे. आपला आनंदकुमार आडे

श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६

श्री. पां. या. जोशी – शहादा – दिनांक २१/११/१९८६ मित्रवर्य श्री. वासुदेवराव स.न. सुंदर हस्ताक्षरातील आपले पत्र मिळाले .  सुवासिक आठवणीप्रमाणे ते जपून ठेवले . प्रेमादरापोटी आपण माझ्यातील लेखकाचे / माझ्या लेखाचे कौतुक केले . “भालचंद्र”ह्या दिवाळीअंकात आपण रामरक्षेवर लिहिले आहे. अजून वाचतोय. रामरक्षेचा भावानुवाद प्रसादिक …

श्री.यशवंत देव – मुंबई -दिनांक ०६/०७/१९९२

श्री. वा.न.सरदेसाई यांना सप्रेम नमस्कर …..   तुम्ही लिहिलेले एकगीत गोमू आकाश झालंया जागं ! जाऊ होरीत बसून दोगं ! तुम्हाला माहीअच आहे ! त्याच पद्धतीची आणखी ५/६ कोळीगीतं तुम्ही लिहून पाठवाल का ? क्यसेटसाठी हवी आहेत . अजून प्रपोजल कच्चेच आहे परंतु मी प्रयत्नात आहे थेंब लाटेचं उरती निलं , तुज्या येणीला आयती फुलं  या फार कल्पनारम्य ओळी आहेत. यी गीताला चाल लागली आहे. म्हणूनअ हे विनंतीवजा पत्र. द्वंद्वगीतं , समूहगीतं सुद्धा असू देत. चालेल. मात्र , कोळी, मासे , समुद्र , सण इतक्यतच काहीही लिहा. आपला यशवंत देव    

श्री.नन्दा आचरेकर , लालबाग, मुंबई -दिनांक ०४/१०/१९८७

प्रति श्री.वा.न.सरदेसाई यांस स.न. आपण लिहिलेल्या ४ ऑक्टोंबरच्या रविवार सकाळमधील  “गाणे” ही गझल वाचली. अर्थातच आवडलीही.  अशाच उत्तमोत्तम गझला आपल्याकडून लिहिल्याजाव्यात हीच आई जगदम्बेचरणी प्रार्थना . गझल कशी लिहावी ह्या संदर्भात आपणाकडून काही माहिती मिळू शकेल …