Currently browsing

Page 24

श्री.यशवंत देव – मुंबई -दिनांक ०६/०७/१९९२

श्री. वा.न.सरदेसाई यांना सप्रेम नमस्कर …..   तुम्ही लिहिलेले एकगीत गोमू आकाश झालंया जागं ! जाऊ होरीत बसून दोगं ! तुम्हाला माहीअच आहे ! त्याच पद्धतीची आणखी ५/६ कोळीगीतं तुम्ही लिहून पाठवाल का ? क्यसेटसाठी हवी आहेत . अजून प्रपोजल कच्चेच आहे परंतु मी प्रयत्नात आहे थेंब लाटेचं उरती निलं , तुज्या येणीला आयती फुलं  या फार कल्पनारम्य ओळी आहेत. यी गीताला चाल लागली आहे. म्हणूनअ हे विनंतीवजा पत्र. द्वंद्वगीतं , समूहगीतं सुद्धा असू देत. चालेल. मात्र , कोळी, मासे , समुद्र , सण इतक्यतच काहीही लिहा. आपला यशवंत देव    

श्री.नन्दा आचरेकर , लालबाग, मुंबई -दिनांक ०४/१०/१९८७

प्रति श्री.वा.न.सरदेसाई यांस स.न. आपण लिहिलेल्या ४ ऑक्टोंबरच्या रविवार सकाळमधील  “गाणे” ही गझल वाचली. अर्थातच आवडलीही.  अशाच उत्तमोत्तम गझला आपल्याकडून लिहिल्याजाव्यात हीच आई जगदम्बेचरणी प्रार्थना . गझल कशी लिहावी ह्या संदर्भात आपणाकडून काही माहिती मिळू शकेल …

श्री. प्र.भा.पाठक – धुळे – दिनांक १३/०८/१९८५

श्री.रा.रा.सरदेसाई साहेब यांस तुम्ही लिहिलेले नभोनाट्य “तू जरा उशिरानेच मावळलास “ जळगाव आकाशवाणीवर ऐकले . एकदम मस्त होते. त्यानंतर रविवारच्या लोकसत्तामथील तुमचे छोट्यांसाठीचे  पाउसगाणेही वाचायला मिळाले. तेही छान होते. परवा  रविवारच्या  महराष्ट्रटाईम्स मथे ” सत्तावीस वजा नऊ “  हा लेख वाचला. खूप आवडला. त्यातील यमके ,प्रास वगैरे मस्त जमले आहे. हल्लीच्या पद्यतही नुसते गद्यच असते, पद्य ओषधालाही नसते. याउलट तुमचा गद्यलेख मात्र पद्यमय होता , काव्यमय होता. आपला प्र.भा.पाठक

सौ.सुजाता जाधव – अंधेरी , मुंबई – दिनांक ०६/११/१९९२

श्री.सरदेसाई यांस स.न.वि.वि. आपले माती माझे कुळ , विट्ठलाचे नाम सोप्याहून सोपे आणि अंधाराची आली पाउले श्रवणी हे तीन अभंग १९७८ च्या   ज्ञानदूत ह्या मराठी दिवाळीअंकात मला मिळाले. त्याचवेळी मी त्यांना चाली लावल्या म्हणजे १३ वर्षांपूर्वी  लावलेल्या चाली आहेत. हे अभंग माझ्या मुली ज्ञानदीपमधे अनेकवेळा गायल्या. अनकांना आपले अभंग अतिशय आवडले . चालीही आवडल्या. आपली नम्र सौ.सुजाता  जाधव  

श्री. सुमेध वडावाला – विलेपार्ले – दिनांक.२१/१०/१९९४

माननीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. मुबई तरूणभारत दिवाळीसाठी आपण पाठविलेली गझल ‘जग’ सुरेख आहे. अर्थघन आहे. ऐकेक दिस येथे मोजून काढला मी आता जगायचे जे ते मोजकेच आहे ! ह्या ओळीही सुंदर ! आपला सुमेध वडावाला

श्री.यशवंत पारखी – (कवी) -डोंबिवली- दिनांक ०९/११/१९९४

कविमित्र , श्री. वा.न.सरदेसाई यांसी सप्रेम नमस्कार वि.वि. मध्यंतरी दूरदर्शनवर तुमचे नांव वाचले होते शिवाय कवितार्तीत तुमची कविता वाचली . इथे एका कवितांच्या मैफलीत तुमची  एक गझल नवोदित गायकाने सादर केली होती. त्याचा तुमचा परिचय नव्हता. नंतर मीच सर्वांना तुमच्याबद्दल सांगितले. आपला यशवंत पारखी

श्री.वसन्त जोशी (लेखक ) – कर्जत – दिनांक २३/०२/१९७१

प्रिय श्री सरदेसाई , सादर नमस्ते आपले १०.१२.१९७० चे नवयुगच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘वासना’ या कथेबद्दल माझे अभिनंदन करणारे पोस्टकार्ड नवयुगच्या संपादकांकडून Redirect होउन परवा मिळले. काहीही परिचय नसतांना आपण अगत्याने पत्र पाठवून कथा वाचल्याचे व आवडल्याचे कळविलेत याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्यासारख्या रसिक वाचकांकडून जेव्हा अशी कैतुकाची पत्रे येतात तेव्हा कसा व किती आनंद होतो म्हणून सांगू ? कारण शेवटी मी तुमच्यासारख्या वाचकांनाच खरे न्यायाधीश मानतो . अस्तु. आपला स्नेहांकित वसन्त जोशी

सौ.मंदा देशपांडे -जळगाव -दिनांक १२/०४/१९८९

श्री. वा.न.सरदेसाई स.न. मी आपले ‘ माझा संसारी भगवान ‘ हे गीत आकाशवाणीच्या सुगमसंगित या कार्यक्रमात गायिले आहे . त्याला स्वरसाज श्री. पुराणीकसर (माझे गुरुवर्य ) यांनी दिलेला आहे. हे गीत ता.०२/०५/१९८९ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रसारीत होणार आहे. आपले ‘ व्रम्हा विष्णू अणि शिवाचा एकरूप ओंकार ” हे ही गीत माझ्या  भावगंध या कार्यक्रमात समूहस्वरात नेहमीच सादर करते. आपली अन्य काही गेयगीते असतील तर जरूर पाठविणे. आपली नम्र सै.मंदा देशपांडे

श्री.रविंद्र कांबळे – नांदगाव, नासिक

प्रति श्री.वा.न.सरदेसाई सस्नेह नमस्कार आपल्या मैफलितल्या कविता आवर्जून वाचणारा मी एक. अता मगेच आपली ‘अयुष्य’ ही गझल वाचली. गझल फारच आवडली म्हणून हा पत्रप्रपंच . आपल्या काव्यप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा ! आपला रविंद्र कांबळे  

श्री.देवरे दगा दोधू , मु.पो.म्हसदी , ता.साक्री , जि.धुळे – दिनांक २८/०७/२०१२

श्री.वा.न.सरदेसाई यांना , देवरेदगाचा सप्रेम नमस्कार पत्रास कारण  की मी लोकमत पेपरातील ‘साहित्यजत्रा ‘ या पुरवणीतील ‘ चंद्र रात्रीला जरा देऊन जा ‘ही कविता वाचली व ती मला खूप आवडली . मलासुद्धा तुमच्यासारखी कविता लिहावी असे वाटते. आपला देवरे दगा दोधू

श्री.भालचंद्र पाठक – ( M.A.,M.Ed.) – बेटावद ता.शिंदखेडे -दिनांक

सन्मित्रप्रवर श्री. वा.न.सप्रेम नमस्कार वि.वि. नुकतंच तुम्ही सादर केलेलं ‘ पानवलकर’ सरांचे व्यक्तिचित्रण तुमच्याच मुखातून ऐकलं . लेखन सरस की निवेदन ? असा संभ्रम पडावा इतकं सुंदर . भाषा सरळ , अनलंकृत आणि विशेष म्हणजे विलक्षण  ओघवती. फारच सुंदर . ऐकतांना क्वचित कुठे  प. लं चे  ‘रावसाहेब ‘ डोकावतात असं वाटून गेलं अतिशय परिणामकारक वाणी-लेखणीचा मास्टरपीस ऐकल्याच समाधान वाटल . मागील  श्रुंखला नभोनाटयातलं लेखन कौशल्य  अप्रतीम . ती idea खूप  नवीन होती . आकाशवाणी काहीवेळा मोठ्या हिमतीनं चांगले कार्यक्रम सादर करतांना दिसते. पुनश्च अभिनंदन ! आपला …

श्री. सुरेश पाचकवडे (कवी )- अकोला – दिनांक २६/१२/१९९१

आदरणीय श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. ‘अनुराधा ‘ दिवाळीअंकातील ‘ तिमिरात कोरले मी ‘ ही सुंदर कविता वाचली आणि भारावून गेलो. आपल्या लेखणीतील गोडवा , अंतःकरणाला रुजला. मन फुलून गेलं. आपली प्रतिभा प्रेशंसनीय तर आहेअ शिवाय , माझ्या साहित्याला प्रेरकही आहे. तसं पाहिलं तर मी तुम्हाला परिचित नाही परंतु  आपलं साहित्य मी अधुनमधुन वाचत असतो. आपल्या साहित्याचा परिचय मला आहे. आपला सुरेश पाचकवडे (कवी )

सौ.विजया जहागीरदार ( विवेक साप्ताहिक जा.क्र.७७१ )- मुंबई- दिनांक १९८५

श्री.वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. तुमची कथा दिवाळीसाठी घेतली असून दोन्ही बालकविताही छान आहेत. तुमच्या बालकविता मला आवडतात . विषय वेगळा असतो. त्याही स्वीकृत. कळावे. स्नेहशील सौ.विजया जहागीरदार -विवेक साप्ताहिक