लिखानासाठी मद्त पाहिजे

  सदस्य

 

नाव :

परवलीचा शब्द:

 

नवीन आहात ?:


 

 लिपीची निवड

 देवनागरी   English
 

 

आजचे कार्यक्रम

 

 

* कविता *  

 

 

 

ओळख :

 

दोहा : दोन ओळींची कविता

दोहा हे जरी मत्राव्रुत्त असले तरी अभंग-ओवीसारखा हा एक काव्यप्रकार आहे .अध्यात्म , जीवनावरील भाष्य , नीती , तत्त्ववोध , सुवचने , सुभाषिते, सुविचार इत्यादींचे दर्शन दोह्यासारख्या दोन ओ़ळींच्या कवितेतूनही  यथार्थपणे नि सहज घडविता येते .

 दोहा : एक मात्रिक सूत्रकाव्यप्रकार

दोहा , सोरठा आदी दोन ओळींचे असतात. दोन ओळींचे चार हिस्से असतात . त्यास पाद असे म्हणतात. प्रथम ओळीचे दोन भाग पडतात. पहिला भाग तेरा मात्रांचा व दुसरा भाग अकरा मात्रांचा असतो. तसेच दुसर्‍या ओळीचा पहिला भाग तेरा मात्रांचा व दुसरा भाग अकरा मात्रांचा असतो. म्हणजे दोन्ही ओळींत तेराव्या मात्रेवर \' यति\' येतो.

पहिल्या व तिसर्‍या म्हणजे विषम पादांत \'ज\' गण ( लगाल) येता कामा नये असा नियम आहे. शिवाय, दोन्ही ओळींच्या अंती लघुवर्णे असावा लागतो.

विषम पादांत ( म्हणजे पहिल्या ओळीचा पहिला हिस्सा आणि दुसर्‍या ओळीचा पहिला हिस्सा ) अंती \'स\" गण (ललगा ) , \'र\' गण (गालगा ) किंवा \'न\' गण (ललल) असावा लागतो. तसेच सम पादांत अंती \'ज\' गण (लगाल) किंवा \'त\' गण ( गागाल ) असावा. दोहयाचे अनेक प्रकार आहेत. त्यात तेवीस प्रकार प्रमु़ख आहेत. दोहयाच्या उलट सोरठा असतो. .यात सम पाद तेरा मात्रांचे व विषम पाद अकरा मात्रांचे असतात.

 
 

 

       हायकू
       दोहा
       इतर