लिखानासाठी मद्त पाहिजे

  सदस्य

 

नाव :

परवलीचा शब्द:

 

नवीन आहात ?:


 

 लिपीची निवड

 देवनागरी   English
 

 

आजचे कार्यक्रम

 

 

 

* प्रवास . . *

कवी : वा. न.सरदेसाई

काव्य - प्रकार : अध्यात्मगीत(गीत)
वृत्त / छंद :

 

 

असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू . .
सोबतीस हे श्वासांवरचे गाणारे पाखरू !

डोक्यावरती नभास पेलित
मी जाताना पुढे
धरतीच्या मायेने , माझ्या
बळ पायांना चढे
मुलासारखे छंदमोकळे चालावे तुरूतुरू !

कळ्याफुलांचे हसणे येते
माझ्या कानावरी
काटयाचे मी दु:ख झेलतो
तळपायाच्या उरी
डोळ्यांमधली ओली नाती लागतात पाझरू !

मनास देतो पानांतिल मी
खुडुनी हिरवेपण
बुडुन जातो कधी , जांभळ्या
गूढ डोंगरांतुन
कधी झर्‍यांचे बांधुन घेतो पायांना घुंगरू !

चंद्र बघे मी दिवसाकाठी
सूर्य रातचा दिसे
तिमिराच्या केसात खोवली
ही किरणांची पिसे
कणात होतो कधी लघू , मी गुरूहूनही गुरू !




Share |

 

 

   अभिप्राय

 

 

 
 
  तुमच्या प्रतिक्रिया नोन्द करण्यासाठी सद्श्य व्हा आणि लोगिन करा.
 

 

* नविन *  

 

गझल

....

 

गीत/कविता

-मी चित्रकार आगळा ..

 

 


रुबाई

....

 

स्वतंत्र-कवितासंग्रह

....

 


 

 

 



कवितेस प्रथम पारितोषिक

वा.न.सरदेसाईंच्या -श्रावणाची जादू - ह्या कवितेस आम्ही पार्लेकर २०११ - कविता स्पर्घेत प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले .