change

पुस्तकात करावयाचे बदल . . .

पान  क्र. काय करायचे
238(1)ह्या गझलेत एकूण ५ शेर आहेत . एक बदल करा .
शेवटचा शेर चार नंबरला घेणे आणि चार नंबरचा पाच नंबरला घेणे . म्हणजे शेर क्रमांक ४ आणि ५ ची अदला बदल करणे . त्यानंतर शेवटी
नवीन ६ वा शेर टाकणे तो पुढे देतोय .
सुख दुर्बिणीतुनि पाहिले . .
नसल्यापरी दिसले अता !   
 
.
240(2)ह्या गझलेत मूळ पाच शेर आहेत . नवीन शेर २ नंबरला टाकायचाय . तो असा आहे .
दात वेगळेच खायचे . .
वेगळेच दाखवायचे !

आणि
शेवटच्या शेरातील शेवटचा शब्द धरायचे असा आहे . त्या ऐवजी भरायचे असा बदल करावा.
.
241(3)ह्या गझलेत पाच शेर आहेत .
नवीन शेर ३ नंबरला टाकायचा आहे . तो शेर असा आहे .
आज माझ्या ढेकरांची कौतुके झाली जरी ,
हाय ! मी तेव्हा कितीदा मारल्या होत्या भुका !

आणि एका शेराचा क्रमांक बदलायचा आहे .
शेवटून दुसरा असलेला मूळ गझलेतील शेर २ र्‍या क्रमांकावर घ्यावा .
.
244(4)शेवटच्या शेरातील पहिला शब्द असा आहे तो बदला आणि कसा ठेवा. आणि शेवटी ? चिन्ह देणे . एकूण दोन बदल ह्या गझलेत आहेत ( शब्द बदल आणि चिन्ह ? )
.
246(5)ह्या गझलेत सहा शेर आहेत .
नवीन शेर ४ नंबरला टाकायचा आहे . तो शेर असा आहे .
दुरून एकटी मला
बघून एकटाच ये !

आणि दोन शेराचा क्रमांक बदलायचा आहे .
शेवटून दुसरा असलेला मूळ गझलेतील शेर ५ व्या क्रमांकावर घ्यावा .
मूळ गझलेतील ४ नंबरचा शेर ६ नंबरला घ्यावा .
.
247(6)ह्या गझलेत पाच शेर आहेत .
नवीन शेर ५ नंबरला टाकायचा आहे . म्हणजे शेवटून दुसरा शेर असा हवा.
चार हाताळून दु:खे मालकाला मी म्हणालो
: काय ह्यांपेक्षा दुकानी चांगली नाहीत दु:खे ?
.
248(7)ह्या गझलेतील पहिल्या दोन ओळी बदललेल्या आहेत . नवीन ओळी अशा आहेत .
चालता थकेन मी , न वाटले मला . .
हे कसे जिणेच भार जाहले मला ?

आणि
ह्या गझलेत पाच शेर आहेत . ३ नंबरचा शेर २ नंबरवर घेणे आणि दोन २ नंबरचा शेर ३ नंबरवर घेणे.
.
249(8)ह्या पानाच्या अगदी वरती रागिणी असा शब्द आहे . त्या ऐवजी नेत्रदा असा शब्द लिहा.
ह्या गझलेतील शेवटून दुसरा शेर , २ र्‍या क्रमांकावर आणणे .
.
252(9)ह्या गझलेतील ४ था शेर बदलला आहे . तो असा आहे .
गुन्हेगार गेला नसावा सुळी . .
सुळा लागले हे सुगावे अता !

ह्या गझलेतील ५ वा शेर बदलला आहे . तो असा आहे .
कुठे कालची आज गेली नदी ?
दिन दिसेनात बाजूस गावे अता !

आणि
२ नंबरचा शेर ह्या गझलेतून काढून टाकणे . तो नकोय .
. 
253(10)ह्या गझलेतील दुसर्‍या ओळीतील परी हा शब्द अवतरण चिन्हात लिहिणे ‘ परी ‘
. 
256(11)ह्या गझलेतील दुसर्‍या ओळीत बदल आहे . ती ओळ अशी लिहावी.
ये कशाने जिवाला उभारी अता !
.
257(12)ह्या पानाच्या अगदी वरती वसुंधरा असा शब्द आहे . त्या ऐवजी दिग्पाल असा शब्द लिहा.
.
258(13)ह्या गझलेतील दिसर्‍या शेरात वांझ शब्दाऐवजी ओस शब्द टाकणे
.
२59(14)ह्या गझलेचा तिसरा शेर काढून टाका . त्या ऐवजी ३ नंबरला खालील शेर टाकणे .
सुखांनी माहिती नाही दिली केव्हाच दु:खांची
अतासे पाठ केले ह्या व्यथांचे बारकावे मी !

शेवटच्या शेरातील पहिली ओळ बदलायची आहे . ती अशी आहे .
उभा मी ठाम आकाशी . . गुन्हा हा सूर्य झाल्याचा ?
.
260(15)ह्या गझलेत ४ थ्या क्रमांकावर एक नवीन शेर टाकायचा . तो असा .
‘ जे खरे ते सांग ‘ ते जेव्हा म्हणाले ,
मी पुन्हा त्यांना कडू बोलून आलो .
.
262(16)ह्या गझलेत ६ व्या क्रमांकावर एक नवीन शेर टाकायचा . तो असा .
चाळिशी लावली पाहण्या . .
अन् दिसे तेच ना पाहवे !
. 
262(17)चौथ्या शेरातील दुसरी ओळ बदलायची आहे . ती अशी .
जुनी टुमदार रंगवता कशी दिसती नवीच घरे !
आणि शेवत शेवटच्या शेरातील दुसरी ओळ बदलायची आहे . ती अशी
कधी परतायचा बघती , निरोप , चिठी उगीच घरे !
.
265(18) ह्या गझलेतील दिसर्‍या शेरातील अर्थ हा बदला आणि त्या ऐवजी साथ हा शब्द टाकणे.
.
266(19)ह्या गझलेतील चौथ्या शेराची पहिली ओळ बदलायची आहे. ती अशी .
मैफली कशास आठवायच्या ?
.
267(20)ह्या गझलेतील चौथ्या शेराची पहिली ओळ बदलायची आहे. ती अशी .
कुठे मी ‘ अंतरा ‘ चा लावतो चष्मा ?
269(21)ह्या गझलेत शेवटून दुसरा म्हणजेच ६ व्या नंबर वर एक नवीन शेर टाकायचा आहे . तो असा आहे .
पाहिली मी जीत थोडी ह्या जगाची . .
काय माझी तीच मोठी हार नाही ?
272(22)ह्या गझलेतील तिसर्‍या शेराची पहिली ओळ बदला .ती अशी .
ह्या निद्रित लोकांस कुठे किंमत त्याची ?
.
273(23)ह्या गझलेत दुसर्‍या नंबरवर वर एक नवीन शेर टाकायचा आहे . तो असा आहे .
मूल मंत्र्यास होताच गावातले
पाळण्याच्याच पाया पडू लागले .
.
274(24)ह्या गझलेतील तिसर्‍या शेरातील पहिली ओळ बदला. ती अशी .
कशास जीवनात ह्या हवीत आयती फळे ?
.
281(25)ह्या गझलेत चौथ्या नंबरावर एक नवीन शेर टाकायचा आहे . तो असा आहे .
लागे न तुझ्या थांग मनाचा . .
का व्यर्थ खडा टाकत होतो ?
.
284(26)ह्या गझलेत सहाव्या नंबरावर एक नवीन शेर टाकायचा आहे . तो असा आहे .
संपला वस्तीतला ‘ तारा ‘ मघाशी . .
आंधळी गावात आता रोषणाई !

आणि पहिल्या शेरातील पहिल्या ओळीच्या शेवटी दोन टिंबे आहेत त्या ऐवजी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे
.
286(26)ह्या गझलेतील दोन नंबरचा शेर बदलला आहे . तो असा ठेवणे .
का हया कळीचे फूल ना व्हावे पहाटे आजही ?
येशील तू , आशेत ह्या मी रात्र सारी जागले !

ह्या गझलेतील तीन नंबरचा शेर बदलला आहे . तो असा ठेवणे .
झाली मिळेनाशी जशी गावातुनीही उत्तरे ,
वेशीवरी त्यांनी स्वतः ते प्रश्न तेव्हा टांगले .

ह्या गझलेतील चार नंबर शेराची पहिली ओळ बदला . ती अशी .
स्वार्थी जगाची एवढी पत्रास मीही का करू ?
287(27)ह्या गझलेतील दुसर्‍या शेराची पहिली ओळ बदलली आहे . ती अशी
आयुष्याचे तू – मी दोघे यात्री . .
तिसर्‍या शेराती दुसर्‍या ओळीत एक शब्द बदलला आहे .
त्या दात्याशी मागायाचे नाही !
शेवटच्या शेरातील शेवटच्या ओळीतील शब्द बदलला आहे .
डोळ्यांत असे हवे . म्हणजे ळ्यां ह्या शब्दावर अनुस्वार हवा.
288(28)ह्या गझलेत २ नंबरला एक नावीन शेर टाकायचा आहे . तो असा .
चालता थबकून तू , वळुनी पुन्हा बघतेस का ?
मागच्या विसरातल्या स्मरणात गुंतवतेस का ?
.
290(29)शेवटून दोन नंबरच्या शेराच्या शेवटच्या ओळीत एक शब्द बदलायचा आहे .
हातात पावा ऐवजी बोटांत पावा असे हवे .
.
 292(30) ह्या गझलेच्या दुसर्‍या शेरातील दुसर्‍या ओळीत एक शब्द बदल आहे .
पडायची आठी ऐवजी उठायची आठी असा बदल करणे.
 . 
293(31)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे . तो शेर ३ नंबरला घेणे .
आंबटषौकी कधी पाउसही यायचा . .
सावध छत्रीतल्या आठवणी आजही .
.
297(32)ह्या गझलेत एकूण ७ शेर आहेत . त्यांचे क्रम बदलायचे आहेत .
मूळ शेर क्र. ३ हा ५ व्या क्रमांकावर घ्यावा .
मूळ शेवटून दुसरा शेर तिसर्‍या क्रमांकावर हवा .
.
299(33)ह्या गझलेत दोन शेर नवीन टाकलेत .
खालील नवीन शेर तीन क्रमांकाव घ्यावा .
दूर पक्षी पांगले संपता इथली सुगी . .
मी फळांनी वाकता , ते वळाया लागले !

खालील नवीन शेर सातव्या क्रमांकावर घ्यावा .
जन्मती विरळा अशी चंदनाची माणसे . .
कोण हे सरणावरी , परिमळाया लागले ?
.
301(34)ह्या गझलेत एक शेर नवीन टाकला आहे.
तो खालील नवीन शेर चौथ्या क्रमांकावर घ्यावा .
आजही राजा तशी असते प्रजाही . .
हे तळाला झिरपणे वरतून असते !
.
302(35)ह्या गझलेतील तीन नंबरचा शेर काढून टाकणे आणि त्या ऐवजी खालील शेर टाकणे .
तुझा फोन येता ,
मना हेलकावे .

त्याव्यतिरिक्त एक अजून नवीन शेर लिहिला आहे तो पाच नंबरला घेणे.
‘ तुला पाहिजे का ? ‘
विचारून द्यावे !
.
305(36)ह्या गझलेत एक नवीन शेर लिहिला आहे तो सहा नंबरला घेणे. शेवटी .
मरण्याची ती वेळ किती सोयीची होती !
जगण्याच्या नादातच हुकले सोनेरी क्षण !
306(37)ह्या गझलेतील पहिल्या शेरातील दुसरी ओळ बदलली आहे . ती अशी .
अजुनि मी कसा तगत राहिलो ?
307(38)ह्या गझलेत शेरांचे क्रमांक बदलायचे आहेत .
मूळ शेवटून दुसरा असणारा शेर दुसर्‍या क्रमांकावर टाकणे .
मूळ दुसरा असणारा शेर शेवटून दुसर्‍या क्रमांकावर टाकणे .
 . 
308(39)ह्या गझलेत तिसर्‍या शेरातील एक शब्द थोडा बदलला आहे .
नात्यांतील ऐवजी नात्यांतिल असे हवे .
ह्या गझलेच्या शेवटून दुसर्‍या शेरातील दुसरी ओळ बदलली आहे .
ती ओळ अशी लिहावी .
सापडती का ह्यास पुरावे ?
.
309(40)ह्या गझलेतील शेवटच्या ओळीतील एक शब्द थोडा बदलला आहे .
अजुन ऐवजी अजुनि असे लिहावे .
.
310(41)ह्या गझलेची पहिलीच ओळ बदललेली आहे . ती अशी .
चंद्रास आजही हे केवढे खळे !
ह्या गझलेच्या दुसर्‍या शेराची पहिली ओळ बदललेली आहे . ती अशी .
झुळुका पसंत मज नव्हत्याच जन्मतः
ह्या गझलेच्या चौथ्या शेराची पहिली ओळ बदललेली आहे . ती अशी .
उध्वस्त येथला हा घाट राहिला . .
ह्या गझलेचा शेवटचा शेर बदलला आहे . तो असा आहे .
दोघांस का कळे सारेच सारखे ?
काही तुला कळे . . काही मला कळे !
.
311(42)ह्या गझलेत पहिल्या शेराच्या दुसर्‍या ऑ ओळीनंतर एक ओळ टाकायची आहे . म्हणजेच पहिल्या शेरात तीन ओळी असतील . त्या अशा .
राहिले रे , अजून श्वास किती ?
जीवना , त्यांमधील खास किती ?
( जीवना , हा गळ्यास फास किती ! )

अशा पद्धतीने तीन ओळी लिहायच्या आहेत .
.
314(43)मूळ गझलेतील शेवटच्या शेरातील पहिली ओळ बदलली आहे . ती अशी
दरवळेल काय ती स्मृती पुन्हा ?
आणि ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे . तो नवीन शेर गझलेत २ र्‍या नंबरला घेणे . तो शेर असा आहे .
न्होकवू नकोस चेहरा असा . .
भाव मी अबोध वाचले तुझे .
.
315(44)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे . तो नवीन शेर गझलेत शेवटून २ नंबरला घेणे . म्हणजे ६ नंबरला . तो शेर असा आहे .
जीवना , तुजला दगा होणार नाही . .
पदरच्या श्वासांवरी विश्वास माझा !
.
316(45)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे . तो नवीन शेर गझलेत शेवटी घेणे . तो शेर असा आहे .
हिला सहवास नव्हता . .
तिला वनवास होता !

आणि मूळ गझलेत पाच शेर आहेत , त्यांचा क्रम बदलायचा आहे .
मूळ चार नंबरचा शेर हा गझलेत दुसर्‍या नंबरला घेणे .
.
317(46)ह्या गझलेतील तीन नंबरच्या शेरातील पहिल्या ओळीतील शब्द असा लिहायचा आहे .
खता – मलमे ,
म्हणजेच खता आणि मलमे मध्ये – असे चिन्ह आहे .
.
318(47)ह्या गझलेतील दोन नंबरच्या शेरातील दुसर्‍या ओळीतील शब्द असा लिहायचा आहे .
होउनि
ह्या गझलेतील तीन नंबरच्या शेरातील पहिल्या ओळीतील शब्द असा लिहायचा आहे .
‘ गुरां ‘ ना
.
319(48)ह्या गझलेती पहिल्या नंबरच्या शेरातील दुसरी ओळ अशी लिहा
निरोप घेताच मी जगाचा . . खुशीत होते !
ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे तो शेर गझलेत दुसर्‍या क्रमांकावर टाक्णे . तो शेर असा आहे .
तुला – मलाही असे कसे वाटते रुसावे ?
अशी कशी त्या क्षणीच दोघांत प्रीत होते !
.
320(49)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे तो शेर गझलेत शेवटून दुसर्‍या क्रमांकावर टाकणे . तो शेर असा आहे .
वेचले ते न राखता आले . .
जमविले फक्त कवडसे येथे !
.
323(50)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे तो शेर गझलेत चौथ्या क्रमांकावर टाकणे . तो शेर असा आहे .
नका फिरवू कुणीही पाठ अपुली . .
तुम्हाला येथले अनुकूल वारे !
.
325(51)ह्या गझ्लेचा पहिला शेर काढून टाकणे आणि त्या ठिकाणी नवीन शेर टाकणे . तो शेर असा आहे .
भिजत होती पापणी हसतो तरी . .
गळत गेली पाकळी फुललो तरी !

ह्या गझलेच्या दुसर्‍या शेरातील दुसर्‍या ओळीतील शेवटचा शब्द बदलायचा आहे .
फुललो च्या ऐवजी रुजलो
ह्या गझलेच्या चौथ्या शेरातील दुसर्‍या ओळीतील शेवटचा शब्द बदलायचा आहे .
असलो च्या उरलो
.
326(52)ह्या गझलेच्या चौथ्या शेरातील दुसर्‍या ओळीतील लावलेला हा शब्द अवतरण चिन्हात लिहावा . असा .
‘ लावलेला ‘
ह्या गझलेचा शेवटचा शेर पूर्णपणे बदलला आहे . तो असा लिहावा .
अंगभर लोकर असो लखलाभ त्यांना . .
मानभर माझी मला आयाळ आहे !
.
327(53)ह्या गझलेत मूळ ७ शेर आहेत . त्यातील तीन नंबरचा शेर काढून टाकणे .
आता ही गझल ६ शेरांची झाली . बरोबर ?
आता दोन नवीन शेर टाकायचे आहेत .
ह्या जगाला फक्त कळते मोल पैशाचे . .
लाख मोलाचे तिथे मी ढाळले अश्रू !

हा शेर गझलेत चार नंबरला घेणे .

वाहणार्‍या ह्या न गंगा आणि यमुनाही . .
हे अता ओल्या मशाली जाहले अश्रू !

हा शेर गझलेत पाच नंबरला घेणे .
.
330(54)पहिल्या शेराची पहिली ओळ बदललेली आहे . ती अशी .
दुर्जन म्हणजे रोगच आहेत खरे म्हणजे !
ह्या गझलेतील तिसरा शेर काढून टाकणे . तो गझलेत नको .
शेवटून दुसर्‍या शेराची दुसरी ओळ बदललेली आहे . ती अशी .
पाठ किती सृष्टीने द्यावेत खरे म्हणजे !
ह्या गझलेत एकूण चारच शेर असतील .
.
331(55)चौथ्या शेराची पहिली ओळ बदललेली आहे . ती अशी .
भिरभिरतसे मन , होउनी फुलपाखरू . .
.
332(56)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकायचा आहे . तो चार नंबरला घेणे . तो असा आहे .
विसरून जा नकोसे संदर्भही जुने . .
गाणे नव्या युगाचे मज गायला हवे !
.
333(57)शेवटून दुसर्‍या शेरातील दुसर्‍या ओळीत बदल आहे. ती ओळ अशी लिहायची .
ऐका , माझ्या दिग्विजयाचे पडघम !
.
335(58)ह्या गझलेत मूळ ५ शेर आहेत. प्रथम त्यांचा क्रम बदलायचा आहे . तो अगोदर बदलून घेउ .
मूळ गझलेतील शेवटून दुसरा शेर , गझलेत दुसर्‍या क्रमांकावर घेणे .
मूळ गझलेतील दुसरा शेर , गझलेत चौथ्या क्रमांकावर घेणे .
म्हणजेच २ र्‍या आणि ४ थ्या शेराचा क्रमांक बदलणे .
त्यानंतर दोन नवीन शेर घातले आहेत . ते असे .
पणत्यांत धार डोळे दिपल्यामुळे न चुकली . .
त्यांना दिवे कसेही विझवायचेच होते !

हा शेर नवीन गझलेत पाचव्या क्रमांकावर घेणे .
मजला म्हणायचे ते तुज नेमके कळाया ,
वगळून शब्द काही संगायचेच होते !

हा शेर नवीन गझलेत सहाव्या क्रमांकावर घेणे .
.
337(59)दोन नंबरला एक नवीन शेर टाकणे तो असा आहे .
संशयी रात्रीस जाग्या लागता डुलकी पहाटे . .
भेटण्यासाठी तुला ती जाग्रणे आहेत माझी .

मूळ गझलेतील २ नंबरचा शेर नवीन गझलेत ५ नंबरला येउ दे .
मूळ गझलेतील शेवटून २ नंबरचा शेर नवीन गझलेत ४ नंबरला येउ दे .
मूळ गझलेतील ४ नंबरचा शेर नवीन गझलेत ६ नंबरला येउ दे .
.
338(60)ह्या गझलेत नवीन दोन शेर टाकले आहेत . ते असे .
स्तुतिपाठकांत मजला कोठेच वाव नाही . .
पढवून बोलण्याचा माझा स्वभाव नाही !


मोहास खास असते त्यांच्या सदैव तेजी . .
माझा सुवर्णचाफा त्याल उठाव नाही !

हे दोन्ही शेर ,मूळ गझलेतील पहिल्या शेरानंतर टाकणे . म्हणजेच नवीन गझलेत हे दोन्ही शेर, क्रमांक २ आणि ३ ला टाकणे .
.
339(61)ह्या गझलेतील तिसर्‍या शेरातील पहिल्या ओळीत एक बदल आहे.
फसवितानाही च्या ऐवजी फसवतानाही असे हवे.
.
340(62)ह्या गझलेतील शेवटून दुसरा शेर काढून टाकणे . तो नकोय .
.
342(63)ह्या गझलेतील चौथ्या क्रमांकाच्या गझलेतील पहिली ओळ बदललेली आहे ती अशी .
अजुनी टिकून आहे माझे रणात प्यादे . .
ह्या गझलेत मूळ ६ शेर आहेत . आता ह्यातील ३ नंबरचा शेर काढून टाकणे तो नकोय .
.
343(64)ह्या गझलेतील शेरांचे क्रम बदलायचे आहेत आणि एक नवीन शेर टाकला आहे.
अगोदर मूळ गझलेतल्या शेरांचे क्रम बदलून घेउयात .
ह्या गझलेतील मूळ २ नंबरचा शेर गझलेत ४ नंबरला घेणे
ह्या गझलेतील मूळ ३ नंबरचा शेर गझलेत २ नंबरला घेणे
ह्या गझलेतील मूळ ४ नंबरचा शेर गझलेत ६ नंबरला घेणे
नवीन शेर ३ नंबरला घेणे . तो नवीन शेर असा आहे .
माझिया स्वप्नांवरीही का तुझा डोळा असावा ?
आसर्‍याला राहुनीही ती मला आधार होती !
.
345(65)ह्या गझलेतील शेवटच्या शेराची पहिली ओळ बदलली आहे . ती अशी .
तुझ्या स्मृतीचा पारिजात सरत्या रात्री . .
.
347(66)ह्या गझलेतील दुसर्‍या शेराची पहिली आणि दुसरी सुद्धा ओळ बदलली आहे . त्या अशी .
बदलून रूप , काडी येता समोर माझ्या . .
पकडून ओंडका तो सागर तरून गेलो !

ह्या गझलेतील चौथ्या शेराची पहिली ओळ बदलली आहे . ती अशी .
हे दार लोटण्याचे नाटक अता कशाला ?
.
349(67)ह्या गझलेत नवीन शेर टाकला आहे . तो शेवटून दुसर्‍या नंबरला घेणे .
तुला बदलून गेलेली जशी मी पाहिली तेव्हा ,
निरोपाच्या क्षणी माझा गळाही दाटला नाही .
.
350(68)ह्या गझलेतील ५ नंबरच्या शेराची पहिली ओळ बदलली आहे . ती अशी.
शासन नवीन आले . . गेला जुना जमाना . .
.
351(69)ह्या गझलेत नवीन शेर टाकला आहे. तो २ नंबरला घेणे. तो असा आहे.
बोलतो मीच जेव्हा मनाशी इथे ,
शब्द ऐकू न येती कुणाचे मला .
.
353(70)ह्या गझलेतील पहिल्या शेराच्या अगोदर दोन ओळी वेगळ्या स्टाईल मध्ये ( फाँट मध्ये ) लिहायच्या आहेत आणि त्या लिहिल्यानंतर त्याखाली एक लाईन टाकायची आहे . त्या दोन ओळी अशा .
कागदाच्याही फुलांना मी म्हणालो . . ' गंध ' आहे !
काय करता , ह्या जगाशी रोजचा संबंध आहे !
__________________________________
जसे वर लिहिले आहे तसेच लिहिणे आणि त्यानंतर आहे ती गझल जशी आहे तशीच आहे. त्यात बदल नाही.
गझलच्या शेवटी कल्याण ह्या शब्दानंतर एक टीप लिहायची आहे .ती अशी.
टीप :
१९८६ साली प्रकाशीत सुमारे ३०० दिवाळी अंकांचे वाचन करून त्यातील फक्त १३ कवितांची निवड ५ संपादकांनी ( समिती ) केली होती . त्या रचना ‘ अक्षर दिवाळी ८६ ‘ या नवीन अंकात समाविष्ठ करण्यात आल्या होत्या . त्या निवडक १३ कवितांत समावेश असलेली वरील रचना आहे.
श्री राम मंत्री आपल्या १५ मे १९८८ च्या महाराष्ट्र टाईम्स ह्या वर्तमानपत्रातील संपादकीय लेखात म्हणतात ” या अंकातील तेरा कवितांमध्ये कुसुमाग्रज , शांता शेळके यांच्यासारख्या कवींबरोबरच डहाके , लिबाळे या नव्या कवींच्या कविता आहेत . ही निवड सार्थ अशीच आहे . सरिता पदकी यांची ‘ द्विक ‘ आणि गझलाची रचना असूनही सामाजिक जीवनातील विसंगतीची तीव्र जाणीव अलिप्त वृत्तीने व्यक्त करणारी वा न सरदेसाई यांंची ‘ काय करता ! ‘ ही कविता विशेष स्मरणात राहील .
.
354(71)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो शेर ५ नंबरला घेणे. तो असा.
होतसे काहीतरी अन् औषधे काहीतरी . .
वैद्यही रोग्याप्रमाणे वाटतो काहीतरी . .
357(72)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो शेर ३ नंबरला घेणे. तो असा.
गर्दी जरी कितीही मी टाळली तरीही . .
तो एकलेपणाही मजला छळून गेला .
357(73)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो शेर ३ नंबरला घेणे. तो असा.
गर्दी जरी कितीही मी टाळली तरीही . .
तो एकटेपणाही मजला छळून गेला .

मूळ ३ नंबरचा शेर नवीन गझलेत ४ नंबरला येइल
मूळ गझलेतील ४ आणि ५ ह्यांचा क्रम बदलणे. म्हणजे
मूळ ४ नंबरचा शेर नवीन गझलेत ६ नंबरला येइल
मूळ ५ नंबरचा शेर नवीन गझलेत ५ नंबरला येइल
.
358(74)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो ३ नंबरला घेणे. तो असा .
त्यांच्या नि माझ्या आजवर नाहीत वरवर ओळखी
मी काल तुमचे जेवलो आहे म्हणावे बारसे !
.
 359(75) ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो ३ नंबरला घेणे. तो असा .
माझी फिरून नौका नेउ कशी किनारी ?
दर्यात ओहटीला अजुनी उधाण आहे !
.
360(76)ह्या गझलेतील तिसर्‍या शेरातील एक शब्द बदलायचा आहे.
लायकीचे ह्या शब्दाऐवजी पात्रतेचे असा शब्द हवाय .
.
361(77)ह्या गझलेतील पहिला शेर बदलला आहे. तो असा आहे .
आयुष्यभर सुखाच्या मागे पळून झाले . .
आभास मात्र त्यांचे गोळा करून झाले !

ह्या गझलेत एक नवीन शेर टाकायचा आहे. तो ६ व्या क्रमांकावर घ्यावा. तो शेर असा आहे .
माझी अशी दशा का होते तुझ्या स्मृतीने ?
क्षण मोहरून झाले . . क्षण ओसरून झाले !
.
362(78)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकायचा आहे तो अगदी सुरवातीला म्हणजे १ नंबरला घ्यायचा आहे . तो शेर असा .
कोणती बाराखडी गिरवून गेले आरसे ?
चेहरे बघताक्षणी वाचून गेले आरसे !

ह्या गझलेतील मूळ ४ नंबरचा ( अप्सरा ) शेर काढून टाकणे. तो नकोय .
ह्या गझलीत पुन्ह दुसरा नवीन शेर टाकायचा आहे . तो गझलेत सर्वात शेवटी घ्यावा .
माणसे बाहेरुनी सुलटी जरी दिसली तरी ,
‘ आत ‘ ती ‘ उलटी ‘ कशी दावून गेले आरसे !
.
363(79)ह्या गझलेत नवीन शेर टाकला आहे. तो ५ नंबरला घेणे . तो शेर असा.
साथीस तारकांनो , नसता तुम्ही तरीही . .
अंधार एकट्याने मी चालणार होतो .

शेवटून दुसर्‍या शेराची दुसरीओळ बदलेली आहे . ती अशी
ओले सुके न बघता मी जाळणार होतो .
.
364(80)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकला आहे. तो गझलेत सर्वात शेवटी घेणे.
उभा जन्म होळीत मी टाकला . .
चिता डागण्याला निखारा नको !
.
365(81)ह्या गझलेतील ५ व्या शेरातील पहिल्या ओळीतील एक शब्द बदलायचा आहे. आनंद च्या ऐवजी निर्धास्त असा बदल करणे.
ह्या गझलेच्या शेवटी तारखेनंतर खाली असे लिहायचे आहे .
मूळ दिनांक २१.०१.१९८४
‘ वसंत ‘ १५ ऑगस्ट १९८५
.
368(82)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकायचा आहे. तो ४ त्या क्रमांकावर
घ्यावा . तो शेर असा .
तांबडे फुटे तो तू – मी त्या रात्री जागत असता ,
विझण्याचे विसरुन तारे चमकण्यात रमले होते !
.
369(83)ह्या गझलेतील चौथ्या शेरातील एक शब्द बदलायचा आहे. फिरुन ह्या शब्दाऐवजी फिरुनि असे लिहिणे.
.
371(84)ह्या गझलेत नवीन शेर टाकायचा आहे . तो शेर शेवटून दुसरा टाका. शेर असा आहे .
सगळेच तयारीनिशी जिंकण्या आले . .
हरण्यास एक माझीच तयारी नव्हती . !
.
373(85)ह्या गझलेतील दुसर्‍या शेरातील पहिला शब्द खालीलप्रमाणे लिहावा.
हार – जितीच्या
ह्या गझलेतील तिसर्‍या शेरातील डोळे शब्द खालील प्रमाणे लिहावा.
‘ डोळे ‘
म्हणजेच चौथ्या शेरातील ‘ काटे ‘ शब्द लिहिला आहे त्याप्रमाणे लिहावा.
शेवटच्या शेरातील पहिल्या ओळीतील पेटुन शब्द पुटुनि असा लिहावा.
एक नवीन शेर ह्या गझलेता टाकायचा आहे . तो ४ नंबरला यावयास हवा. तो शेर असा आहे .
घरी मला लागल्या झळा ‘ वेगळ्या ‘ चुलींच्या
जंगलात मी कळपातुनि बागडेन म्हणतो .
.
374(86)ह्या गझलेतील चौथ्या शेरातील पहिल्या ओळीत बदल आहे. तो असा .
दार जरी ना उघडो कोणी ,
ह्या गझलेतील पाचव्या शेरातील पहिल्या ओळीत बदल आहे. असा .
नाजुक कोमल ती इतकी की ,
हे झाल्यानंतर आता ह्या गझलेतील मूळ ४ था शेर ३ नंबरवर आणणे
म्हणजेच मूळ तीन नंबरचा शेर ४ नंबरला येइल .
.
375(87)ह्या गझलेत नवीन शेर ४ नंबरला टाकायचा आहे.
नको मजकडे आज काहीच मागू . .
उरे एक झोळी मला वापराया !
.
376(88)ह्या गझलेतील तिसर्‍या शेरातील दोन्ही ओळी बदललेल्या आहेत. त्या अशा .
पीस तेवढे दे पडलेले . .
मोरा , मागत मी न पिसारा !

ह्या गझलेतील चौथ्या शेरातील दोन्ही ओळी बदललेल्या आहेत. त्या अशा .
दिसतेस रोज तू ओझरती
बांधतेस पायी का पारा ?

ह्या गझलेतील शेवटच्या शेरातील पहिली ओळी बदलली आहे. ती अशी.
होते राख जळो कोणीही . .
.
377(89)ह्या गझलेतील चौथ्या शेरातील दुसर्‍य ओळीत बदल आहे.
अन् बघा कसे मोहरून बसलो आम्ही !
ह्या गझलेत नवीन शेर २ नंबरला टाकायचा आहे. तो असा आहे.
टकमका प्रियेचे मुख चंद्राने बघता ,
जवळचा दिवा मालवून बसलो आम्ही !
.
378(90)ह्या गझलेतील चौथ्या शेरातील पहिल्या ओळीत बदल आहे. तो असा .
होताना स्पर्श कळीला खुपणारच होते काटे . .
.
380(91)ह्या गझलेत नवीन शेर ६ व्या क्रमांकावर टाकायचा आहे. तो असा .
हे कुणाला हासल्याविना ठावे ?
आसवे सांभाळणे बरे नाही .
.
381(92)ह्या गझलेत शेवटच्या शेरातील पहिली ओळ बदलली आहे. ती अशी .
माझ्याच पाकळ्यांचा होऊन कुस्कराही
388(93)ह्या पानावरील दुसरी ओळ बदला . ती अशी हवी .
वैशिष्ट्य :रुबाईची प्रत्येक ओळ वेगवेगळ्या वृत्तांत आहे . उर्दूत अशी सूट घेतली जाते .
वैशिष्ट्य हा शब्द पूर्वी वैशिष्ठ्यअसा होता . तो बदलला आहे आता .
390(94)क्रमांक तीनच्या रुबाईतील पहिली आणि दुसरी ओळ बदलली आहे .
हा गुच्छ फुलांचा साधा तुजसाठी !
ने , लाख सदिच्छा पथिका सांगाती
.
390(95)क्रमांक पाचच्या रुबाईतील शेवटची ओळ बदलली आहे .
‘ हसता हसता फुलापरी पड गळुनी ! ‘
.
391(96)रुबाई नं १२ ची शेवटची ओळ बदलली आहे . ती अशी आहे .
दुसर्‍यात तुला पाहत जा . . जमले तर !
.
391(97)ह्या ३९१ पानावर असलेल्या क्रमांक ११ व्या रुबाईनंतर एक नवीन १२ नंबरची रुबाई टाकायची आहे . ती अशी आहे .
तो चंद्र जरी उगवत असला गगनात . .
मी चंद्र बघे लाडिक तुझिया वदनात
ही संथ नदी , मस्त हवी . . गंधित रान . .
हे मात्र कुणाला न मिळे सुख सदनात !
.
392(98)ह्या पानावरील प्रथम क्रमांकाच्या रुबाईतील शेवटच्या ओळीतील एक शब्द बदलायचा आहे .
माणुसकी शब्दाऐवजी सोशिकता असा शब्द हवा . नवीन शब्द अवतरण चिन्हात नको .
.
392(99)ह्या ३९२ नंबरवर असलेल्या क्रमांक १४व्या रुबाईनंतर एक नवीन १५ नंबरची रुबाई टाकायची आहे . ती अशी आहे .
आयुष्याच्या दारी तोरण नव्हते . .
जगण्याचे मज काही कारण नव्हते
अद्याप कशी थड श्वासांची दोरी ?
की , काळाला पुरते धोरण नव्हते ?
.
392(100)ह्या ३९२ पानावरील शेवटून दुसर्‍या २१ नंबर असलेल्या मी मेल्याचे दु : ख ह्या रुबाईनंतर २२ नंबर घालून नवीन रुबाई टाकायची आहे . ती अशी .
दुनियेचा बाजार . . इथे चीज हरेक . .
जे पटला तो जिन्नस घे . . किंमत फेक !
आईबाप न मात्र दुकानी मिळतात . .
पण , ह्या हाटाची अपली औरच टेक !
.
392(101)ह्या ३९२ पानावरील सर्वात शेवटी २४ नंबर घालून नवीन रुबाई टाकायची आहे . ती अशी .
नेणार कुठे ही मजला खडतर वाट ?
होणार कधी घनतिमिरातून पहाट !
हे प्रश्न कितीही अवघड आज असोत . .
मंजूर असे मज समयाची वहिवाट !
.
393(102)ह्यातील शेवटून दुसर्‍या रुबाईतील तिसर्‍या एक शब्द बदलायचा आहे .
गिधाडांनी ऐवजी विषारांनी
.
394(103)ह्यातील पहिल्या रुबाईतील शेवटच्या ओळीत बदल करायचा आहे. ती ओळ अशी हवी .
फासत जा हास्यरंग ठेवणीतला !
395(104)ह्या पानावर क्र १ नंतर ४ क्रमांक असलेली रुबाई आहे . नवीन २ आणि ३ क्रमांक असलेल्या दोन रुबाया नवीन लिहिल्या आहेत . त्या टाकणे . रुबाया पुढील प्रमाणे .
ना पडे प्रकाश . . काय उपयोग कळून ?
ना सुटे सुवास . . काय उपयोग फुलून ?
जोवरी न प्रेमभाव जागा हृदयात . .
ना घडे ‘ मनुष्य ‘ . . काय उपयोग जगून ?

वरील रुबाईपूर्वी २ आकडा घालावा .
आता पुढील रुबाईपूर्वी ३ आकडा घालावा . ती रुबाई अशी .
भेटलीस काल तो बहाणा झाला . .
जीव ठार त्याक्षणी दिवाणा झाला !
शब्दही न बोलता निघालीस जशी ,
आज हे जिणे मला उखाणा झाला !
.
395(105)ह्यातील २ नंबरच्या रुबाईतील चौथी ओळ बदलली आहे . ती अशी.
ही जगासा दाखवायची नाही बाग !
.
395(106)ह्यापानावरील ४ क्रमांकाची रुबाई जिच्यासमोर ६ आकडा आहे तिच्या शेवटच्या ओळीतील सहवास हा शब्द असा लिहावा ‘ सहवास ‘
.
395(107)ह्यापानावरील ४ क्रमांकाची रुबाई जिच्यासमोर ६ आकडा आहे त्यानंतर एक नवीन रुबाई टाकायची आहे . त्या रुबाई अगोदर ७ आकडा घालणे . ती रुबाई अशी .
माणसा , नको स्तोम करू भक्तीचे . .
सहज दार उघडेल तुला मुक्तीचे !
प्रेमभावना उत्कट म्हणजे भक्ती
तोड , बंध तू मोहक आसक्तीचे !
.
395(108)ह्यापानावरील शेवटून दुसर्‍या क्रमांकाची रुबाई जिच्यासमोर ८ आकडा आहे त्यानंतर एक नवीन रुबाई टाकायची आहे . त्या रुबाई अगोदर १० आकडा घालणे . ती रुबाई अशी .
जोवरी असे अत्तर, फायास सुवास . .
वाहनात जागा , तोवर होय प्रवास
समजतो तरीही हा मानव उलटेच . .
क्षणिक ह्या जगाला कायमचाच निवास !
.
396(109)ह्यापानावरील तिसर्‍या क्रमांकाची रुबाई जिच्यासमोर १४ आकडा आहे त्यानंतर एक नवीन रुबाई टाकायची आहे . त्या रुबाई अगोदर १५ आकडा घालणे . ती रुबाई अशी .
कायदे कशाला करतोस माणसा ?
त्यात तूच दोषी दिसतोस माणसा !
वागण्यात नीती नसल्याशिवाय का . .
तू ‘ वकील ‘ होता हरतोस माणसा ?
.
399(110)ह्यापानावरील पहिल्या क्रमांकाची रुबाई जिच्यासमोर १० आकडा आहे तिच्या पहिल्या दोन ओळी बदलल्या आहेत . त्या अशा .
गाळून पहा घाम कधी आपणहून . .
शेतात तुझ्या येइल मोती उगवून !
.
405(111)ह्यापानावरील दुसर्‍या क्रमांकाची रुबाई जिच्यासमो २ आकडा आहे तिच्या शेवटच्या ओळीतील पहिले दोन शब्द असे लिहायचे आहेत .
‘ कोणास तरी ‘
.
410(112)पान क्र. ४१० ची सुरवात अशी करावी .
हजरत इल्लाम – प्रणीत वृत्तांनुसार ‘ अक्षरगण ‘ वृत्तांतील बारा रुबाया .
खुलासा / स्पष्टीकरण:
प्रस्तुत रुबायांचा मी एक स्वतंत्र आणि सलग असा एकजिनसी विषय निवडला आहे ; तो आहे पावसाळी नक्षत्रांच्या संदर्भातला . त्यामुळे रुबायांचा एकूण कल आणि स्वरूप नक्षत्र – वर्णनात्मक राहिले आहे . पावसाळी सण , उत्सव ह्यांचाही उल्लेख अर्थातच त्यांत आला आहे .
बादशहाने ‘ सत्तावीस उणे नऊ म्हणजे किती ? ‘ ह्या विचारलेल्या प्रश्नला बिरबलाने ‘ शून्य !’असे उत्तर दिले . त्या उत्तरानेच पुढील रुबायांचा समारोप करीत आहे .

त्यानंतर रुबाया आहेत तशाच घेणे . त्यात काही बदल नाही .
.
410(113)२ र्‍या रुबाईत आठ ओळी आहेत . त्यातील सर्वात शेवटच्या ओळीत उडायचे म्हणून असा शब्द आहे तो शब्द बदलला आहे . तो असा .
उडू उडू म्हणून !
.
219(114)पान नंबर २१९ वर दोहा क्रमांक ५८आहे. त्यानंतर पुढील दोहे नवीन लिहिले आहेत ते टाकणे . दोह्यांना पुढील क्रमांक देत जाणे .
पिकास पोषक होतसे , मेघाचे जलदान
तसे हिताचे लेकरा , मातेचे स्तनपान ! दि. ०३.०८.२०१७
झुळूक येता डोलते , आनंदाने फूल
काटा बसतो ढिम्मसा , जसे अडाणी मूल ! दि. ०४.०८.०१७
सुखदु:खाला फूल अन् काट्याचे उपमान . .
फूल अल्पजीवी परी , काटा
आयुष्मान ! दि. ०९.०८.२०१७
भाव मनी असल्यावरी , पत्थरही भगवान . .
डबक्यामध्येही तुला , घडेल गंगास्नान! ! दि. १०.०८.२०१७
निंदा करणार्‍यासही बघा देउनी मान . .
स्तुती ऐकता सारखी , बंद करावे कान ! दि. .१०.०८.२०१७
हातीचे तुझिया तसे , छातीतही घड्याळ . .

एक कळीवर चालते , दुजे चालवी काळ ! दि. ११.०८.२०१७
स्वर डग्ग्याचा घोगरा . . तबला बोले गोड
मैफलीत पण गाजते त्यांची साथ विजोड ! दि. १३.०८.२०१७
तबला – डग्ग्याला मिळे मैफलीत बहुमान . .
दोघांना दो आसने , शेषाचिया समान ! दि. १५.०८.२०१७

तबला – डग्ग्याला बसे , दो हातांनी मार
मैफल गर्जे – ‘ क्या कहें . . आयी बडी बहार ! ‘ दि. १५.०८.२०१७
( मैफिल गर्जे – ‘ वाहवा ! आयी बडी बहार ! ‘ )

उदास का असशी जशी , बांधावरली धोंड . .

पहा , कसे शेतामधे फुले कपाशी – बोंड ! दि. १७.०८.२०१७
अशी प्रार्थनाही नको केल्याविण राहूस . .
” शेतात ‘ तुझ्या ‘ ही पडो , वेळेवर पाऊस ! ” दि. १७.०८.२०१७
मार अंकुशाचा शिरी , मग चाले गजराज
हातोडी बसता फुटे , तबल्याला आवाज ! दि. १८.०८.२०१७
थापांविण ना बोलवे , त्याचे नाव ‘ मृदंग ‘ . .
नामाविण ना राहवे , त्याने नाव ‘ अभंग ‘ ! दि. १३.०९.२०१७
माळी बघ बागेमधे . . कोळी भरदर्यात . .
साळी मागावर पहा , गढलेला कार्यात ! दि. १३.०९.२०१७
एका धातूचे जरी . . बघ , दैवाची चाल
झांज राहते मोकळी . . बंधनामधे टाळ ! दि. २५.०९.२०१७
( सर्व दोह्यांचे लेखन कल्याण / भांडुप येथे )
.
.
257(115)मूळ २१ नंबरची गझल ” फुलेच वेचायाचे ” ही आता १३५ क्रमांकावर टाकायची आहे . असे करतांना त्या गझलचे वृत्त वसंधरा असे पूर्वी टाकण्यात आले आहे . ते नाव बदलून दिग्पाल असे गझलेच्या वर लिहिणे .
257(116)त्या पूर्वीच्या २१ नंबरच्या गझलेच्या जागी एक नवीन गझल टाकायची आहे . ती गझल अशी आहे .
वृत्त / छंद :मानवती

मुक्त कसे गीत नवे ये अधरी ?
पायरवाचीच तुझिया जादुगिरी !

सुंदर चंद्रास ढगांचा विळखा
का छळते याद तुझी ह्या प्रहरी ?

मी न बघे दूर वरातीस तुझ्या . .
ऐकत आहे सनई दर्दभरी !


वाट अशी की न कुठे वाटसरू . .
वृक्ष न , पक्षी पण अद्याप तरी !

ह्या दुनियेनेच मला संपविले
मीच जिला श्वास दिले आजवरी !

दि. ०८.०३.२०१० कल्याण
.
293(117)मूळ गझ्ल क्र. ५७ नंतर त्याच विभागात लगेचच नवीन गझल टाकायची आहे . ती गझल अशी . त्या गझलचा क्रमांक नवीन ५८ असेल .

वृत्त / छंद : चांदणे

मी जनातला टाळतो रस्ता . .
अन् मनातला चालतो रस्ता !

टेकडीस केव्हा मिठी मारी . .
अन् नदीसही चुंबतो रस्ता !

वाटला जरी कोरडा आता ,
हा बरेचदा वाहतो रस्ता .


जे मधून येतात माघारी ,
ते बघून ओशाळतो रस्ता !

पावले जशी फाटती माझी ,
हा स्वतःच का संपतो रस्ता ?

पाय ना धरी जो कुणाचेही
तोच मी खरा मानतो रस्ता !

दि. ०८.०२.१९८९ नंदुरबार
.
333(118)मूळ गझ्ल क्र. ९६ नंतर त्याच विभागात लगेचच नवीन गझल टाकायची आहे . ती गझल अशी . त्या गझलचा क्रमांक नवीन ९९ असेल .

वृत्त / छंद : सती + जलौघवेगा

अता जरी आरशात माझे बघून झाले . .
हसायचे ते कधीच गाली हसून झाले !

चुकून तू ती कबूल केलीस चूक आता . .
तुझ्या स्वभावास हे खरे तर धरून झाले !

उन्हात तू अन् तुझीच मी सावली धरावी ?
कोठून नसते विचार तेव्हा करून झाले ?


सुरू जशी जाहली लढाई रणांगणाला ,
तसे घरांच्या बिळांत ह्यांचे दडून झाले .

सुपातल्यांची अखेर जात्यातल्यांप्रमाणे . .
कधी कुणाचे हसून झाले . . रडून झाले !

( ‘चांदण्याची तोरणे’ ह्या माझ्या गझलसंग्रहातून )

.
338(119)मूळ गझ्ल क्र. १०० नंतर लगेचच नवीन गझल टाकायची आहे . ती गझल अशी . त्या गझलचा क्रमांक नवीन १०४ असेल .

वृत्त / छंद : मध्यरजनी

कल्पना नसता असेही एकदा होऊन गेले . .
मोकळे होताच मागे ते मला गोवून गेले !

कालच्या भेटीत अपुल्या सांग दुसरे काय झाले ?
बोललो काही , तरी काही मुके राहून गेले !

रोज पै-पैचा हिशेबच ह्या नव्या वस्तीत चाले . .
हे नको तेथे रुपेरी चांदणे सांडून गेले !


गोड संसारास अपुल्या दृष्ट का लागे कुणाची !
सलग आढेही घराचे आणखी मोडून गेले !

मी जसा धारेत शिरलो , वाटले नावेत आहे . .
लाट येता , काठचे जे . . ते म्हणे वाहून गेले .

आज आलेल्या फळांचे श्रेय का द्यावे तुम्हाला ?
मागच्या काही पिढ्यांचे लोक बी पेरून गेले !

दि. ०१.०७.१९८६
.
344(120)
मूळ गझ्ल १०७ च्या जागी नवीन गझल टाकायची आहे . ती गझल अशी . त्या गझलचा क्रमांक नवीन १११ असेल .

वृत्त / छंद : जीवकलिका

असे सामान खोलीभर कशाला विस्कटावे मी ?
मघापासून म्हणतो की जरा घर आवरावे मी !

घरी आहे बसायाला तिच्यापुरतीच सतरंजी…
घडीने फाटकेपण हे किती वेळा शिवावे मी ?

हवेला लागता थोडी तिची चाहूल दाराशी
कडीने मंद वाजावे . . इशारे ओळखावे मी !


तिला मी उंबरावरचे बघावे फूल झालेले . .
रडू येऊन वाटावे , असेसुद्धा हसावे मी !

मनस्वी भावना माझ्या कशा भेटीत सांगव्या ?
तिच्या डोळ्यांत लिहिलेले मुक्‍याने गीत गावे मी !

अशी ही अत्तराची सय मला भिजवून गेली की . .
मनाने होउनी फाया, स्वतःशी दर्वळावे मी !

( दि. २३.०२.२०१४ च्या ‘ सकाळ ‘ मध्ये प्रसिद्ध )


.
348(121)मूळ गझल क्रमांक ११० आणि १११ च्या मध्ये , म्हणजे ११० नंतर नवीन गझल टाकायची आहे . ती अशी . आता तिचा क्रमांक ११५ असेल .

वृत्त / छंद : रसना

विश्वास केवढा हा टाकून बैसलो मी !
त्यांचा सुरा जिव्हारी खोवून बैसलो मी !!

तेव्हा कसे दिसावे मज रंग अंतरीचे ?
रंगीत मुखवट्यांना भाळून बैसलो मी .

अंधार मूक पाही तोंडाकडे कधीचा . .
कोठून ऐन वेळी तेवून बैसलो मी ?


आकाश काय खोटे बोलायचेच नाही ?
पत्थर उगा उरी का ठेवून बैसलो मी ?

घर बांधण्यात माझी अर्धी शिकस्त झाली . .
घर सांधण्यात अर्धा मोडून बैसलो मी !

.
370(122)मूळ गझल क्रमांक १३२ आणि १३३ च्या मध्ये , म्हणजे १३२ नंतर नवीन गझल टाकायची आहे . ती अशी . आता तिचा क्रमांक १३९ असेल .

वृत्त / छंद :रसना

आयुष्य मी विजेचे जगलो मनाप्रमाणे . .
उजळून जग क्षणी त्या , विझलो मनाप्रमाणे !

माझा विनोद जेव्हा कळला न पंडितांना ,
गंभीर चेहर्‍यांना हसलो मनाप्रमाणे !

केला कुठे कधी मी उपहास जिंकल्यांचा ?
मी मात्र झुंजताना हरलो मनाप्रमाणे !

दिसला वसंत . . तो ही लांबून पाठमोरा . .
मग , बाळगीत काटे फुललो मनाप्रमाणे .


सारी हयात माझी त्या लक्तरांत गेली . .
नसुनी जगात आता सजलो मनाप्रमाणे !

( ‘चांदण्याची तोरणे ‘ ह्या माझ्या संग्रहातून
)
.
372(123)मूळ गझल क्रमांक १३४ आणि १३५ च्या मध्ये , म्हणजे १३४ नंतर नवीन गझल टाकायची आहे . ती अशी . आता तिचा क्रमांक १४२ असेल .

वृत्त / छंद :रसना ( तरही गझल )

हल्ली हवेत सुद्धा करतात वाटमारी !
मग , काय पाखरांनी घेऊ नये भरारी ?

माझी जरी खुशाली आली विचारण्याला . .
सारीच माणसे ही योजून भेटणारी !

जगणेच माणसाचे जादूगिरी नव्हे का ?
माणूस येथ होतो सावज कधी शिकारी .

कोषात शब्द असतो साधा . . सुताप्रमाणे . .
ओठांत मात्र होतो तो शस्त्रही दुधारी !

‘ निघता कधी ? ‘ दयेने मजला नका विचारू
केली जगात येता मी जयची तयारी !

.
374(124)मूळ गझल क्रमांक १३६ आणि १३७ च्या मध्ये , म्हणजे १३६ नंतर नवीन गझल टाकायची आहे . ती अशी . ती गझल नवीन पुस्तकात १४५ असेल.

वृत्त / छंद : भूपति
.
थेंब नेत्री तुझ्या यायला हवा होता . .
क्षणभरी पण कुणी आपला हवा होता !

ते तुझे लाजणे . . चंद्र व्हायचा जखमी . .
ह्याहुनी कोणता दाखला हवा होता ?

एकही मैत्र ना लाभला भल्यापैकी . .
एक वैरी तरी चांगला हवा होता !

मी जरी ‘ वाहवा ‘ जाहलो तुझ्या ओठी ,
फक्त आवाज तो ‘ आतला ‘ हवा होता !

वाळवंटापरी रुक्ष चित्र जन्माचे . .
ह्यात सोबत तुझा काफला हवा होता .

हात हाती जरी घेतलेस तू माझे . .
स्पर्श ‘ त्या ‘ वेळचा आजला हवा होता !
.
381(125)मूळ पुस्तकात शेवटची गझल १४३ नंबरची आहे . त्या गझलेनंतर खालील नवीन गझल टाकायची आहे . ही गझल नवीन पुस्तकात १५३ नंबरची होइल .

वृत्त / छंद : मध्यरजनी

लाख असता चांदण्या , का रात्र अंधारीच आहे ?
सोबती झाले तरी मी आज एकाकीच आहे !

प्रेम मी केले तरी हे घोकणे जमलेच नाही . .
‘ माझियासाठीच तू . . अन् मी तुझ्यासाठीच आहे ! ‘

तूच आलेली . . कसे हे बंद दरवा़ज्यास कळते ?
आजही त्याला तुझी ती ओळखीची टीच आहे !

तीर्थयात्रेच्या न गेलो मी कधी वाटेससुद्धा . .
ज्या ठिकाणी माय माझी ती मला काशीच आहे !


तेच रामायण अताही घडतसे . . व्यक्ती निराळ्या . .
ज्यास तू भुललीस तो हा मृग नव्हे . . मारीच आहे !
.
381(126)
मूळ १०७ नंबरची गझल ही आता १५४ क्रमांकावर टाकलेली आहे . तशी विनंती वर केली आहेच .
.
381(127)आता त्यानंतर शेवटच्या दोन गझला टाकायच्या आहेत . नवीन पुस्तकात त्या गझला क्रमांक १५५ आणि क्रमांक १५६ असतील. त्या दोन्ही गझला इथे देतोय .

गझल क्रमांक १५५

व्रुत्त / छंद :चंद्रकला

माणसात ‘ व्यापार्‍याला ‘ पाहून घेतले . .
तोंड त्या फुलांनी अपुले झाकून घेतले !

मी न शब्द मातीसाठी कोठेच टाकला . .
फक्त नभापाशी सूचक बोलून घेतले !

दाते असूनही सारे गरजू तरी किती ?
जे मला दिले ते त्यांनी मागून घेतले .

राहिल्या हिशेबी जेव्हा कोठेतरी चुका ,
मित्र खरेखोटे पण मी मोजून घेतले !

घोट हा विषाचा दाहक नाही मला नवा . .
कालकूटही मी आधी प्राशून घेतले !

ते अ कराया बसले कविता जगावरी . .
केवढे मनाला त्यांनी लावून घेतले !


( ‘ आभाळपंख ‘ हा माझ्या संग्रहातून )
381(128)आता त्यानंतर शेवटच्या दोन गझला टाकायच्या आहेत . नवीन पुस्तकात त्या गझला क्रमांक १५५ आणि क्रमांक १५६ असतील. त्या दोन्ही गझला इथे देतोय .
गझल क्रमांक १५६

व्रुत्त / छंद :अनलज्वाला

रानोमाळी शिंपित अमृत आला श्रावण . .
दानाचे आश्वासन पाळत आला श्रावण !

चांदीच्या थेंबांचे पैंजण बांधुनि पायी ,
पानोपानी छमछम नाचत आला श्रावण !


कशी अचानक कडेकपारी फुले उमलली ?
मऊ हिरवळीवरून हासत आला श्रावण !


बाळउन्हांशी अंगणबांधी नदीकिनारी . .
लपंडाव ओलेता खेळत आला श्रावण .

नभी पर्‍यांच्या वाटेवर हा उत्सव कसला ?
सडा सात रंगांचा टाकत आला श्रावण !

‘ सोडा घरटी . . हवेत थोडे डुंबू सगळे . . ‘
चिंब पाखरू सुटले सांगत – ‘ आला श्रावण ! ‘

सुवासिनींच्या मुग्ध लाजर्‍या गाली ओठी . .
शृंगाराचे तुषार गोंदत आला श्रावण !
.
386 , 387(129)पान क्रमांक ३८६ वरील दुसरी गझल ” हल्ली हवेत सुद्धा ” ही गझल कट करणे. ती ह्यापेजवर नमो . डिलिट करा .
पान क्रमांक ३८७ वरील गझल ” मी जनातला ” ही गझल कट करणे. ती ह्यापेजवर नमो . डिलिट करा .
.
130अनुक्रमणिका झाल्यानंतर लगेच ही माहिती लिहायची आहे .अनुक्रमणिका नंतर देतो
गझल विभागाच्या शेवटी(130)सर्व गझला झाल्यानंतर स्वतंत्र पानावर घेणे .
गझल विभाग :
नवीन / बदललेल्या वृत्तनामासंबंधी खुलासा .

‘ आकंठ ‘ २००२ दिवाळी अंकाच्या गजल – विशेषांकाचे कार्यकरी संपादक म्हणून डॉ. राम पंडित ह्यांनी काम पाहिले . सदर अंकात प्रसिद्ध झालेली ‘ रागिणी ‘ वृत्ताची ‘ लगावली ‘ मुद्रणदोषामुळे त्रुटी दाखवित आहे , हे पुढे लक्षात आले . . हे नजरचुकीमुळेच घडले होते , हे उघड आहे .
परंतु , त्याच ‘ लगावली ‘ ला प्रमाण मानून मी दि. १५.०२.२००५ रोजी जी गझल लिहिली तिच्या वृत्ताचे नाव काय असावे , असा प्र्श्न निर्माण झाला .
मी डॉ . पंडितांशी संपर्क साधला . ‘ आकंठ ‘ २००२ मध्ये छापून आलेल्या त्या ‘ लगावली ‘ नुसार दुसरे तसे कोणतेही वृत्त मराठीत नाही , हे स्पष्ट झाले ; म्हणून त्यांनीच सुचविल्याप्रमाणे मी सदर गझलेच्या एका शेरावरून वृत्ताचे नवीन नामकरण ‘ नेत्रदा ‘ असे करीत असल्याचे डॉ. पंडितांना कळविले . . त्यांनी ह्याची दखल घेतली आहे .
. . वाचकांनी कृपया ह्याची नोंद घ्यावी ही विनंता ! ( असा खुलासा मी सन २०१७ मध्ये ‘ इंद्रनील प्रकाशना ‘ ने प्रसिद्ध केलेल्या ‘ माझ्या शेरोशायरीतील काही शब्दशिल्पं ‘ ह्या ललितबंध – संग्रहात केलेला आहे . )
माझ्या ‘ अंगाई ते गझल – रुबाई . . ‘ ह्या समग्र काव्यसंग्रहाच्या प्रथमावृत्तीत प्रसिद्ध झालेली ‘ वसुंधरा ‘ वृत्तातील गझल ‘ दिग्पाल ‘ ह्या नावाने मात्रिक छंदात घेतली आहे .
‘ चांदणे ‘ नामक गझल मल उत्स्फूर्तपणे सुचलेली अशी स्वतंत्र गझल आहे . तिचे नामकरण मी स्वत : केले असून ‘ अंगाई ते गझल – रुबाई . . ‘ च्या प्रथमाव्चु वृत्तीत ती अंतर्भूत केली आहे . गण : र , य , य , ग असे आहेत .
तूर्त , हेही वृत्त मान्यतेच्या प्रतीक्षेत . . .
131लगेच दुसर्‍या पानावर खालील माहिती सुरु करणे . खालील माहिती लिहिण्यापूर्वी अगोदरच पान क्रमांक ४१८ पहाणे . त्यातच थोडा बदल आहे दुसरे काही नाही .
परिभाषा , व्याख्या , चिन्ये आणि अर्थ . . शिवाय , यतिविचार .
( आवश्यक तेवढीच . . थोडक्यात पण महत्त्वाची माहिती . )
अक्षर म्हणजे एकावेळी तोंडातून बाहेर पडणारा ध्वनी . कोणत्याही स्वरास किंवा स्वरयुक्त व्यंजनास अक्षर म्हणतात .
मात्रा म्हणजे स्वराच्या उच्चारास लागणारा काल .
लघू अक्षराचे चिन्ह uअसे आहे .म्हणजे र्‍हस्व उच्चार . . ल = एक मात्रा .
गुरू अक्षराचे चिन्ह – आहे . म्हणजे दीर्घ उच्चार . . गा = दोन मात्रा.
गण दोन प्रकारचे आहेत –
१) अक्षरगण – एकूण आठ . तीन अक्षरांचा एक गण . गण : य , र , त , न , भ ज , स , म .
२) मात्रागण – एकूण पाच . गण : म स , ज , भ , न ( इथे दोन गुरू म्हणजे ‘ म ‘ गण आणि सलग चार लघू म्हणजे ‘ न ‘ गण . )
काव्य दोन प्रकारचे आहे –
एक गद्यरूप आणि एक पद्यरूप . ज्यास पाद किंवा चरण नाहीत ते गद्य . ज्याला पाद आहेत ते पद्य .
पद्याच्या अक्षरनियमाला वृत्त म्हणतात . पद्याच्या मात्रानियमाला ‘ जाति ‘ असे म्हणतात . .( मा त्रिक छंद / वृत्त )
आणखी काही चिन्हे आणि त्यांचे अर्थ :
प म्हणजे एकूण आठ मात्रा
म्हणजे निच्छित गुरू
उ म्हणजे १४ किंवा १५ मात्रा .
अवसान म्हणजे थांबणे म्हणजेच ‘ यति ‘ .
यति पादांती म्हणचे ‘ यपा ‘ चरणांती .
जातिरचना : बहुतेक जातिरचना पद्मावर्तनी आहेत .
हरावर्तनी म्हणजे पंचमात्रकावर्तनी . भृंगावर्तनी म्हणजे षण्मात्रकावर्तनी . अग्न्यावर्तनी म्हणजे सप्तमात्रकावर्तनी . पद्मावर्तनी म्हणजे अष्टकमात्रकावर्तनी
* प्रतीकात्मक संज्ञा – हरावर्तनी : हर म्हणजे शिव . पंचानन – म्हणून पंचमात्रक . भृंगावर्तनी : भृंग / षट्पद म्हणून षण्मात्रक . अग्न्यावर्तनी : अग्नी / सप्तजिव्ह ( सात जिभांचा ) म्हणून सप्तमात्रक . पद्मावर्तनी : पद्म( कमळ ) / अष्टदल म्हणून अष्टमात्रक .
‘ यति ‘ ( यती ) , मोडणी , इत्यादीविषयी अधिक माहिती प्रामुख्याने ‘ छंदोरचना ‘ ह्या प्रा . माधव त्रिं . पटवर्धन ( माधवजुलियने ) लिहित ग्रंथातून घेतली आहे . .
( संदर्भ : छंदोरचना आणि वृत्तदर्पण . त्यासाठी ‘ छंदो.’ आणि ‘ वृत्त.’ असा थोडक्यात उल्लेख केला आहे .
132यतिविचार . . . ( छंदो. / पृष्ठ ६३ , किरण ९ वे )
* पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना , जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावा लागतो , त्याला ‘ यति ‘ म्हणतात .
* हा ‘ यति ‘ ज्या ठिकाणी घ्यायचा त्या ‘ जिव्हेष्टविश्रामस्थानाला ‘ लाही ‘ यति ‘ म्हणतात . यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो . तुकडा पडतो . म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती , निदान पदसामाप्ती तरी व्हावी . तसे न झाल्यास तो कर्णकटू दोष होतो , त्याला ‘ यतिभंग ‘ म्हणतात . ( छंदो . / पृष्ठ ६३ )
* ‘ यति ‘ मानावा की नाही ह्याविषयी मतभेद आहे असे दिसते . पिंगल (छंद : शास्त्रज्ञ ) आणि जयदेव हे ‘ यति ‘ मानतात ; तर मांडव्य , भरत , कश्यप आणि सैतव हे मानीत नाहीत . . . ह्याचा अर्थ पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे . तर ‘ यति ‘ हा पद्य म्हणण्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निच्छित मानीत नसत एवढाच केला पाहिजे . ही अनिच्छिती चरणांतर्गत ‘ यति ‘ विषयी असली पाहिजे . ( छंदो. / वृत्त . ४ / ७ )
” यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्थे नु विशेषत : ” असे परंपरागत वचन आहे .
* चरणांती ‘ यति ‘ हा निरपवादपणे असलाच पाहिजे ; कारण पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्याच अनुरोधाने पडतात. ( छंदो. / पृष्ठ ६३ )
* चरणांतर्गत यती मानावयाचा की नाही , मानावयाचा झाल्यास त्याचे स्थान कोणते इ. गोष्टींविषयी मतभेद संभवतो . . उदा . इंद्रवज्रा , उपेंद्रवज्रा या अकरा अक्षरी वृतांत पिंगल यती सांगत नाही . पण ‘ शालिनी ‘ या अकरा अक्षरांच्या वृत्तांत तो ‘ यति ‘ सांगतो तो असा : [ गागागागा ! गालगागालगागा ] पण
मंदारमरंदचंपूचा कर्ता श्रीकृष्णकवी हा इंद्रवज्रा / उपेंद्रवज्रा वृत्तांत पाचव्या अक्षरानंतर ‘ यति ‘ सांगतो . तर कानडी छंन्दो s म्बुधीचा कर्ता नागवर्मा हा स्वतंत्रपणे ‘ यति ‘ सांगतो . इंद्रवज्रा / उपेंद्रवज्रात ‘ ‘ यति पादान्ती ‘ असे स्पष्टपणे म्हटले आहे . ( वृत्त . पृष्ठ १९-२० )
* शालिनी , पृथ्वी , शार्दूलविक्रीडित इत्यादी वृत्तांच्या चाली परंपरेने चालत आल्या म्हणून जिवंत राहिल्या आहेत . त्यांच्या यतिस्थानांविषयी बहुशः मतभेद होत नाही . ( छंदो. / पृष्ठ ६४ )
यतिस्थानी विराम घ्यायचा तो न्यूनाधिक असू शकतो . त्या ठिकाणी जर नुसता खटकाच असेल तर तो स्वल्पविराम समजावा. (छंदो. / पृष्ठ ६५ )
*अनेक वृत्तांत पिंगलाने सांगितलेली यतिस्थाने चुकीची वाटतात . (छंदो./ पृष्ठ ६६ )
वृत्त : ज्या पद्यातील चरण विशिष्ट अक्षरसंख्या , लगक्रम आणि मोडणी वा गणविभागणी ह्यांनी नियमित असतात , ते ‘ वृत्त ‘ होय .
मोडणी –
अंतर्गत आंदोलनानुसार होणारी गणविभागणी भिन्न भिन्न होऊ शकते . ह्या गणविभागणीस ‘ मोडणी ‘ म्हटले आहे . ( छंदो. / पृष्ठ ९० )
एखाद्या वृत्ताच्या अनेक मोडण्या संभवतात . तथापि , जेथे चरणात एखाद्या विशिष्ट गणाची आवृत्ती आहे तिथे जेणे करून ती आवृत्ती भंगेल अशी मोडणी घेणे उचित नाही. ( छंदो. / पृष्ठ ९१ ) . .नमुन्यादाखल दिलेले मोडणीचे खालील उदाहरण पहा –
‘ मयूरसारिणी ‘ ह्या वृत्ताची अधिकृत मोडाणी छंदोरचनाकारांनी
[ गालगालगा लगालगागा ] अशी ( छंदो. / पृष्ठ १४७ वर ) दिलेली आहे . तरीही ह्या वृत्ताची मोडणी [ गालगाल I गालगाल I गा s गा ] अशी भृंगावर्तनी अधिक चांगली दिसेल असे ते म्हणतात ( छंदो. / पृष्ठ १५१ ) असो . ‘ यति ‘ विषयी खूप समजून घेण्यासारखे आहे . तूर्त एवढेच !
समारोप करीत असताना, ‘ पद्यरचनेचे व्याकरण ‘ ह्या अध्याय १ मध्ये पृष्ठ ४ वर छंदोरचनाकार म्हणतात : छंदशास्त्राच्या अभ्यासाने एक – दोन शुद्ध पद्ये अतिक्लिष्ट वृत्त्तांतही रचता येतील ; पण सरस प्रवाही काव्य हे निसर्गदत्त प्रेतिभेविना केवळ छंदःशास्त्राच्या बळाने निर्माण करणे अशक्य आहे . . पद्य हे काव्याचे केवळ शरीर होय . ते सप्रमाण आणि सुरेख पाहिजेच . पण , हे कलेने नटवायचे शरीर रमणीय भावार्थाने सचेतन हवे . शृंगारलेले कलेवर काय कामाचे ? ( समाप्त )
228(133)‘ लोकगीत ‘ ह्या वरील कवितेसंबंधी :
विशेष : ‘इक्कीसवीं सदी की चुनिंदा मराठी कविता ‘ ह्यासाठी माझ्या ‘ लोकगीत ‘ कवितेची निवड . . एकूण ६२ कवितांचा ‘ मराठी कविता का समकाल ‘ ह्या नावाने प्रसिद्ध झालेला ( हिंदीत अनुवादित ) कविता संग्रह . अनुवादक : डॉ . श्री प्रकाशजी भातम्ब्रेकर . मुंबई . प्रस्तावना : प्रा. डॉ. रणधीर शिंदे , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर . ( प्रकाशन : विजया बुक्स दिल्ली )
105(134)पान क्र. १०५ नंतर नवीन भावगीत टाकायचे आहे. ते असे .
भावगीत
तो : शब्दांस गे कळाले अपुले सखी गुपीत
ती : ते शब्द आज गाती स्वच्छंद भावगीत . .
तो : मोहोरगंध – वेडी
ती गर्द आमराई
ती : पंचामृतात भिजला
कोकीळकंठ गाई
तो : अपुल्या मिठीत फुलला मज आठवे वसंत . .
तो : ओढ्यात त्या करावी
आंघोळ चांदण्यांनी
ती : गवतातुनी पहावे
डोकावुनी दंवांनी
तो : पंखांसवे धुक्याच्या यावी हळू पहाट . .
तो : दाही दिशांवरूनी
चढली अनंतवेल
ती : हलकेच मी खुडावे
तेजाळ चंद्रफूल
तो : वेणीत माळण्याला माझे अधीर हात . .

शहादा
175(135)पान क्र. १७५ नंतर नवीन 3 रचना टाकायच्या आहेत . त्या अशा .

माझी बहीण बहीण . .

– माझी बहीण बहीण
तिचा साखर – स्वभाव
तिच्या डोळ्यांत मायेचे
आहे वसलेले गाव . .

– जातो मधून गावाला
तिथे वाटे आपुलेसे . .
तिने अंगणी जपले
माझ्या पावलांचे ठसे . .

– तिचे बोलणे -हसणे
शब्दफुलाला सुगंध . .
आठवणींचा जडतो
असा मनालागी छंद . .

– सोन्यासारखे सासर
काय दौलतीला तोटा
माझ्या बहिणीच्या दारी
जाती आनंदाच्या वाटा . .

– वाट पाहात असेल
माझी ताई अहोरात्र
दार – चौकटीत जसे
उभे मांगल्याचे चित्र . .

– भाऊबीजेला घालता
माझी साधी ओवाळणी
कुठूनशी भेटीवर
सांडे ओली हिरकणी . . !

दि. ७.१०.२०१३ , कल्याण
175(136)श्रावणाची जादू . .

चल , श्रावणाची जादू
खुल्या निसर्गात बघू
तिथे म्हणे , जोडीदार
होती मैना आणि राघू . .

जसे झाकाया असते
जादुगाराचे फडके
तसे जांभळ्या दरीत
गूढ पांढुरके धुके . .

लता-वेलींचा मेळावा
गवताच्या पायघड्या
सुरू फुलपाखरांच्या
फुलांभोवती फुगड्या . .

शेत शेत होते पाटी
जशी राबे बैलजोडी
रोपे भाताची काढती
वर हिर्वी बाराखडी . .

कसा दिसे धबधबा
कोसळता कपारीत
जणू उभ्याने धावते
नदी सोडोनिया रीत . .

कुठे ओळीत पाखरे
देती सरीला सलामी
दाट झाडीत झडती
रानगीतांच्या तालमी . .

सोन्याचांदीचा चालतो
ऊन-पावसाचा खेळ
सात रंगांचा क्षितिजी
झुले अधांतरी पूल . .

तिथे बांधावे लागते
घट्ट मिठीत घरटे
राहायचे कसे सांगू
दोन असून एकटे !

दि. १३.०८.२०१० , कल्याण
175(137)श्रावण . .

क्षितिजाने उघडली
इंद्रधनुष्याची छत्री
कशी भिजली नकळे
नखशिखांत धरित्री . .

आली मातीला चमक
ओल्या चांदीच्या वर्खाने
झाले आकाशी रंगाचे
थेंब थेंब छापखाने . .

चाळ बांधून सरींचे
नाचे अंगणी श्रावण
वासुदेवाची होतसे
पदोपदी आठवण . .

पावसाशी खेळायला
हळू उतरून ऊन
ढगाआडच्या सूर्याचा
आले डोळा चुकवून . .

वारा कुठूनसा आणी
गंध वेचून फुलांचा
पायवाटेला खुपतो
नवा गवती गालीचा . .

पक्षी बांधाया लागले
स्वप्नातली घरकुले
जशी झाडांना फुटली
हिर्व्या सोनियाची कौले . .

उडी घेत धबधबा
धावे भेटाया प्रियेला
न्हाण आलेल्या नदीला
काठोकाठ पूर आला . .

दि. ०३.०८.२०११ , कल्याण
413 TO 417(138)पृष्ठ क्र. ४१३ ते ४१७ काढून टाकणे . ही पाने आता नकोत . कारण आपण सर्व माहिती अनुक्रमणिकेतच दिली आहे .
386(139)ह्या पानावरील दुसरी गझल हल्ली हवेत सुद्धा काढून टाकणे .ती नकोय .
387(140)ह्या पानावरील चांदणे ही गझल काढून टाकणे . ती नकोय .
291(141)शेवटच्या शेरातील पहिल्या ओळीतील अरे हा शब्द नको . त्याऐवजी तिथे हा शब्द टाकणे.
293(117)293(117) गझल पुन्हा पहाणे . म्हणजे नवीन ५८ नंबरची गझल पहाह्या गझलेत शेवटी एक शेर टाकायचा आहे . तो असा .
झेलतो उन्हाची फुले हाती . .
चांदण्यातही पेटतो रस्ता !

ह्या गझलेत खालील शेर आहे . त्यात बदल करायचा आहे .
पावले जशी फाटती माझी ,
हा स्वतःच का संपतो रस्ता ?
तो शेर असा हवा.
पावले जशी फाटती माझी ,
आपसूख का संपतो रस्ता ?
310(142)ह्या गझलेत अगदी शेवटी नवीन एक शेर टाकायचा आहे .
इतक्यात मी तुझी आठवण काढता ,
हा का पदोपदी रस्ताच दरवळे ?
312(143)ह्या गझलेतील ४ च्या शेरात हवेच्यावर हा शब्द खालील प्रमाणे लिहावा.
हवेच्या वर . ( म्हणजे जोडून नको तो शब्द )
319(144)ह्या गझलेतील ४ च्या शेरात पत्थरांपुढे हा शब्द खालील प्रमाणे लिहावा.
‘ पत्थरां ‘ पुढे .
( म्हणजे अवतरण चिन्ह वापरले आहे )
327(145)ह्या गझलेतील ४ च्या शेर असा आहे
ह्या जगाला फक्त कळते मोल पैशाचे
ह्या ओळीतील ह्या हा शब्द बदलला आहे , त्या ऐवजी
ज्या जगाला फक्त कळते मोल पैशाचे असे लिहावे
329(146)ह्या गझलेतील पहिल्या ओळीत गुपित हा शब्द आहे . त्या ऐवजी गूज हा शब्द लिहिणे.
330(147)ह्या गझलेतील ३ नंबरचा मूळ काढून टाकला होता आपण. तो शेर पुन्हा टाकणे . तो शेर असा आहे .
ताईस असे सासर मिळण्यास नको होते
पडली तुळस कशी त्या भांगेत खरे म्हणजे ?

ह्या गझलेतील पहिल्या शेराची दुसरी ओळ बदलली आहे . ती अशी .
राहूच नका त्यांच्या समवेत खरे म्हणजे !
341(148)ह्या गझलेतील शेवटचा शेरातील शेवटची ओळ अवतरण चिन्हात टाकायची आहे . ती अशी टाकणे
‘ एकदा आली तुलाही विसरल्याची सय अता ! ‘ काय , पटते का पहा .
350(149)ह्या गझलेतील पहिला शब्द अमुचांत असा आहे . त्यावरील अनुस्वार काढून टाकणे आणि तो शब्द अमुच्यात असा लिहावा
363(150)ह्या गझलेतील एक शेर असा आहे.
धर्मा विरुद्ध जाणे माझा स्वभाव नाही . .
ओले सुके न बघता मी जाळणार होतो !
ह्या शेराची दुसरीओळ बदलली आहे ती अशी लिहिणे
ओले सुक्यानिशीही मी जाळणार होतो !
364(151)ह्या गझलेतील मूळ शेवटच्या नंबरचा शेर आपण काढून टाकला होता आणि नवीन शेर टाकला होता . जो शेर काढून टाकला होता तो पुन्हा टाकणे .म्हणजे खालील प्रमाणे
जिथे लाटही पाय ओढू बघे ,
बुडालो तरी तो किनारा नको !

आणि ह्या शेरानंतर
उभा जन्म होळीत मी टाकला . .
चिता डागण्याला निखारा नको !
367(152)ह्या गझलेतील दुसर्‍या ओळीत बदल आहे .
नि:शस्त्र मी , तरीही त्यांचे प्रहार झाले !
अशी ओळ आहे . त्यात खालील बदल करणे.
नि:शस्त्र मी , तरीही मागून वार झाले !
368(153)ह्या गझलेत एक नवीन शेर टाकायचा आहे . तो शेवटून दुसरा हवा . तो शेर असा :
शेतीला माझ्या तेव्हा येताच गंध घामाचा
उठलेले वादळ मागे लाजेने शमले होते !
370)154)१३२ नंतर नवीन गझल टाकाली आहे . ती १३९ क्रमांकावर टाकली आहे .
आयुष्य मी विजेचे जगलो मनाप्रमाणे . .
उजळून जग क्षणी त्या , विझलो मनाप्रमाणे !

ह्यातील दुसरी ओळ बदलली आहे .
आयुष्य मी विजेचे जगलो मनाप्रमाणे . .
जग लक्ख उजळताना विझलो मनाप्रमाणे !
ख ला ख असे लिहिणे .मी क ला ख असे लिहिले आहे कारण मला ते जमत नाहीये .
381(155)गझल क्रमांक १५५
माणसात ‘ व्यापार्‍याला ‘ पाहून घेतले . .
तोंड त्या फुलांनी अपुले झाकून घेतले !
मी न शब्द मातीसाठी कोठेच टाकला . .
फक्त नभापाशी सूचक बोलून घेतले !
ह्यातील दुसर्‍या शेरातील दुसरी ओळ बदलली आहे . ती अशी आहे
मी न शब्द मातीसाठी कोठेच टाकला . .
सावळ्या नभाला केवळ भेटून घेतले !.

ह्याच गझलेत खालील शेर आहे . त्यात फक्त एक शब्द बदलला आहे . तो हिरव्या रंगाने दाखवला आहे .
ते अता कराया बसले कविता जगावरी . .
केवढे मनाला त्यांनी लावून घेतले !
228(156)ह्या कवितेच्या सातव्या ओळीची सुरवात अवतरण चिन्हाने करायची आहे . अशी .
मी माझा एकटा .
ह्या कवितेच्या पहिल्या दहा ओळींनंतर म्हणजे , थकत नाहीस . . थांबत नाहीस ..! ह्या नंतर एक ओळ टाकायची आहे .
मला . . मला हे माझे दमणारे पाय नकोत “ ती ओळ टाकल्या नंतर सुरू झालेले अवतरण चिन्ह पूर्ण करणे.
382 to 385गझलांगणीचा शेरसडा हा भागच पुस्तकातून डिलिट करा. म्हणजे पान नंबर ३८२ते ३८५ काढून टाकणे
391(157)ह्या ३९१ पानावर असलेल्या क्रमांक ११ व्या रुबाईनंतर एक नवीन १२ नंबरची रुबाई टाकली आहे . त्यातील एक शब्द बदलला आहे . तो लाल अक्षरात लिहिला आहे.
तो चंद्र जरी उगवत असला गगनात . .
मी चंद्र बघे लाडिक तुझिया वदनात
ही संथ नदी , मस्त हवा . . गंधित रान . .
हे मात्र कुणाला न मिळे सुख सदनात !
392(158)ह्या ३९२ नंबरवर असलेल्या क्रमांक १४व्या रुबाईनंतर एक नवीन १५ नंबरची रुबाई टाकली आहे . त्यातील एक शब्द आणि एक ओळ बदलली आहे . ते लाल अक्षरात लिहिले आहे.
आयुष्याच्या दारी तोरण नव्हते . .
जगण्याचे मज काही कारण नव्हते
अद्याप कशी थड श्वासाची दोरी ?
की , काळाला पुरते धोरण नव्हते ?
संचित माझे काय विलक्ष्ण नव्हते ?
393(159)ह्या रुबाईतील पुन्हापुन्हा हा श्ब्द सर्वठिकाणी पुन्हा पुन्हा असा वेगळा लिहावा.तीन वेळा हा शब्द आला आहे.
395(160)३९४ पानावर जी रुबाई आहे ती अशी हवी.
माझ्या मागून रंग लावण्या चला . .
घ्या , रंजक एक शब्दकुंचला भला
दुनियेच्या ह्या उदास चेहर्‍यावरी . .
फासत जा हास्यरंग ठेवणीतला !
395(161)ह्या पानावरील रुबाईचा एक शब्द अवतरण चिन्हात घालणे.
काल ही किती फुलायची ‘ शाही ‘ बाग !
395(162)ह्यातील २ नंबरच्या रुबाईतील चौथी ओळ बदलली आहे . ती अशी होती.
ही जगासा दाखवायची नाही बाग !
आता ह्या ओळीतील जगास शब्दाऐवजी जनास असा शब्द बदलणे.
398(163)ह्या ३९८ पानावरील रुबाई जिच्या समोर ९ लिहिले आहे त्यातील शेवटची ओळ अशी आहे
ही संतमनाची हळवी कोमलता !
त्यात बदल करणे .
ही संत – मनाची हळवी कोमलता ! असे लिहिणे
412(164)ह्या ४१२ पानावरील रुबाई जिच्या समोर ९ लिहिले आहे त्यातील पहिल्या ओळीतील तुपात हा शब्द बदलणे . तो शब्द तुपाळ असा लिहिणे .
406(165)ह्या ४०६ पानावरील रुबाई जिच्या समोर ६ लिहिले आहे त्यातील तिसर्‍याओळीतील तु अमुच्यांत शब्द बदलणे . तो शब्द अमुच्यात असा लिहिणे. शब्दावरील अनुस्वार काढून टाकणे .
219(166)वीन दोहा आपण टाकला आहे . तो तुम्ही टाईप केला असाल कारण मी तुम्हाला वर तसे सांगितले होते . तो शेवटचा दोहा असा आहे .
तो दोहा काढून टाकणे . तो नकोय
एका धातूचे जरी . . बघ , दैवाची चाल
झांज राहते मोकळी . . बंधनामधे टाळ ! दि. २५.०९.२०१७

त्या नंतर दोन दोहे नवीन टाकणे . त्यांच्या लिखाणाची दिनांक टाकू नये. ते दोन दोहे असे आहेत .
येता – जाता सांगणे , त्यास मिळेना कान
जाता – जाता सांगणे , त्यास ‘ सुभाषित ‘ मान !


मिळून सर्वांनी असा , अलग न धरता वाट
मुखी पडतसे घास अन् शिते केरकचर्‍यात !

प्रतिक्रिया टाका