मन मला जागेपणी

वृत्त : प्रमाणिका
गण  : गालगागा गालगा गालगागा गालगा

 

मन मला जागेपणी का छळाया लागले ?
अर्थ  मौनांचे तुझ्या मज कळाया लागले !

 

भर नव्हाळीचा अता येतसी गाली तुझ्या . .
चांदणे अभ्र्यावरी ओघळाया लागले

 

!
शर्यतीची पैज मी जिंकली काळासवे
आज माझ्या मागुती  क्षण पळाया लागले

 

!
डाग दुनियेचा जसा मी पुसाया  लागलो ,
स्वच्छ माझे हातही मग मळाया लागले .

 
कोरडे जे राहिले पावसाळ्यातूनही ,
दोन अश्रूंनी तुझ्या घर गळाया लागले !

 

 

.

प्रतिक्रिया टाका