पुन्हा कधी असाच . . .

वृत्त : प्रमाणिका
गण  : लगालगा  लगालगा

पुन्हा कधी असाच ये . .
जरा नको . . बराच ये !

 
तसाच भेटशील ना ?
जसा  ऋतू नवाच ये .

 
नकोस स्वप्न दाखवू . .
समोर तू खराच ये !

 
झुळूक येतसे तसा
कुणा न सांगताच ये .

 
निमित्त पाहिजेच का ?
उभ्याउभ्या उगाच ये !

 
म्हणेन भेटल्यावरी . .
‘ अजून एकदाच ये ! ‘

 

.

प्रतिक्रिया टाका