कलहात मी फुलांच्या . .

मात्रावृत्तातील गझल

वृत्त : रसना
गण : गागाल गालगागा x २
( आनंदकंद ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )

 

कलहात मी फुलांच्या कोमेजणार होतो . .
धोका नव्या ऋतूंना हा सांगणार होतो !

 

मज कल्पनाच नव्हती की , आज अवस आहे
वेणीत चंद्र तुझिया मी माळणार होतो .

 

का कायदा जगाचा मजला भिऊन गेला
शपथेवरी खरे ते जर बोलणार होतो ?

 

अद्याप त्या क्षणाचे उपकार मानतो मी . .
ते जिंकणार होते . . मी संपणार होतो !

 

धर्माविरुद्ध जाणे माझा स्वभाव नाही
ओल्यासही सुक्यासह मी जाळणार होतो .

 

ते दीप आरतीचे विझते न ऐनवेळी ,
दारात वादळांना ओवाळणार होतो !

 

प्रतिक्रिया टाका