‘रंगश्री’ एक नाट्यवेडी संस्था . ! – शहादा समाचार -लेखक- श्री.सजन भिला पाटील-दि. ०२/१०/१९७३

‘रंगश्री’ एक नाट्यवेडी संस्था    . ! – शहादा समाचार -लेखक- श्री.सजन भिला पाटील-दि. ०२/१०/१९७३

Group Photoimg007

( रंगश्री नाट्यसंस्था (शहादा ) कलावंत (समूहचित्र ). श्री. वा.न.सरदेसाई (बसलेले ) डावीकडून पहिले. संस्थेचे लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेते )

कोकणातील देवरूखजवळील मोर्डे गावचा एक नाट्यवेडा तरुण शहाद्यात येतो काय आणि शहरवजा गावातील

हौशी कलाकारांचा संच बांधतो काय ,साराच चमत्कार .

श्रवणकुमार , दामभाई , महागावकर , केतकर इं.च्या धडपडीतून चालणार्रया ‘कलाविहार’लाच एक  नवा घाट या तरूण कलाकाराने दिला. ‘रंगश्री ‘ला खराखुरा आकार आला १९७२ मध्ये . नाट्यतंत्राचा स्पर्श ‘रंगश्री’ने सादर केलेल्या मोजक्याअ नाट्यप्रयोगातूनस्पष्टपणे जाणवतो. विशेषतः स्त्रीनेच स्त्रीभूमिका अभिनित करण्याचे धाडसी पाऊल रंगश्रीने टाकले. ‘ तुझें आहे तुजपाशीं ‘च्या पहिल्या- वहिल्या प्रयत्नात . सै.सुमनताई-साळवे , सौ.साठे , सौ.सरदेसाई यांनी या बाबतीत रंगश्रीला साथ दिली. यानंतर ओळीने ‘संगमरवरी स्वप्न ‘ , ‘तेथे कर माझे जुळती’ , ‘वेगळं व्हायचंय मला ‘असे एकाहून एक रंगतदार प्रयोग शहरात आणि अन्यत्रही सादर केले.मोठ्या आत्मविश्वासाने पाऊले भरणार्‍या रंगश्रीला यशाची पावती दिली ‘त्याची वंदावी पाउले‘ ने. या वा.न.सरदेसाईलिखित व दिग्दर्शित प्रयोगाला महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत , तिसरे पारितोषिक मिळाले आणि ‘रंगश्रीच्या नाट्यगुणांवर रसिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाले. हाच रंगश्रीचा हिट प्रयोग . दौर्यावर रंगश्रीने ‘त्याची वंदावी पाऊले ‘ व ‘तेथे पाहिजे जातीचे . . ‘ अशी भिन्न प्रकृतीची नाटके यशस्वीपणे सादर करून आपल्या नैपुण्याचे अप्रतिम दर्शन घडविले. संघभावना , अभिनयातील सफाई, रंगमंचकावरील जिवंत हालचाली , यांचा अपूर्व संगम या दैर्यात जाणवला.आपापले व्यवसाय सांभाळून एका विशिष्ट निष्ठेने आणि जिद्दीने नटाराजाची उपासना करनारी ही मंडळी ज्या संघभावनेने प्रत्येक काम करते त्यातच ‘रंगश्री’चे यश आहे हे त्यांच्या प्रत्येक हालचालीतून स्पष्ट होते.’रंगश्रीचा’ मुखवटा एकदा चढविला की सगळेच रंगभूमीचे उपासक बनतात. दिग्दर्शक रंगमंच सिद्धतेसाठी खिळा ठोकील तर सारे नट  प्लैटस वाहून नेण्यातही अप्रतिष्ठा मानणार नाहीत. एक आगळ्याच धुंदीत सारेजण भारल्यासारखे एकत्र येतात आणि यशाचा आनंद चाखीत आपापल्या  लौकिक जगात परततात. वा.न.सरदेसाई  ही  रंगश्रीची प्रेरणा . विलक्षण काव्यवेडा नाटककार , तरल कल्पना शक्ती , मानवी स्वभावाचे कमालीचे सूक्ष्म निरीक्षण व नित्यनूतनतेचा हव्यास यामुळे लेखणीत विलक्षण  जादू आहे.याचे प्रत्यंतर शब्दागणिक जाणवावे. दिवाळी अंकातून लेखन होतच असते . ‘माती गाते गीत आपुले’ हे नाटक नुकतेच हातावेगळे केले आहे.रंगश्रीचा गुणी नट म्हणून बाळ वडनेरेकडे अंगुलीनिर्देश करता येईल. शेकडो मैलावरून ‘रंगश्री’च्या मदतीला धावून येणारा हा (बाळ ) कृष्ण रंगभूषा व वेशशूषेची बाजू परंपरीने सांभाळीत  आला आहे. ‘रंगश्री’ही केवळ नाट्यसंस्था नाही तर ती एक नाट्यशाळा आहे, एक सांस्कृतिक केंद्र आहे. उपासकांनी जिद्दीने पुढे यावे आणि रंगश्रीच्या रंगात मनसोक्त डुंबावे , कीर्ती मिळवावी तीच रंगश्रीची शिदोरी.

‘रंगश्री’ एक नाट्यवेडी संस्था  . . . . ! – शहादा समाचार – दिनांक ०२/१०/१९७३

___________________________________________________________________________________________

श्री.वा. न. सरदेसाईंनी ‘ रंगश्री ‘ व अन्य नाट्यसंस्थांद्वारे केलेली काही नाटके :

त्याची वंदावी पाउले

माता न तू वैरिणी

तेथें कर माझे जुळती

तेथें कर माझे जुळती

तुका म्हणे त्यातल्या त्यात

वेगळं व्हायचंय मला

अपराध मीच केला

तुझें आहे तुजपाशीं

 

 

 

प्रतिक्रिया टाका