ह्या नगरीच्या

 

ह्या नगरीच्या कशा आठवणी आजही
पाहुणचारा उभ्या आठवणी आजही !

 

ह्याच किनार्‍यावरी भेट तुझी व्हायची . .
त्या लहरींसारख्या आठवणी आजही !

 

कोण तिथे मारती, आतुर हाका मला ?
रानफुलांच्या मुक्या , आठवणी आजही

 

चंद्र असे आपला एक दिवा खाजगी
गूढ दिव्याखालच्या आठवणी आजही !

 

त्या झुडपांआडची ती वचने . . चुंबने . .
ओठभरी राहिल्या आठवणी आजही !

प्रतिक्रिया टाका