हे का कुणी फुलांना सांगायला हवे ?

वृत्त       :  विद्द्युल्लता

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगा

 

हे का कुणी फुलांना सांगायला हवे ?
त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे  !
रसिकांसमोर जेव्हा मांडीन खेळ मी ,
तुम्हांसही व्यथांनो , रंगायला हवे !

प्रतिक्रिया टाका