हे कधीचे कफन शृंगारीत आले . .

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : मंजुघोषा

 

हे कधीचे कफन शृंगारीत आले . .
लोक माझ्याशी कसे गोडीत आले !

 

सोडुनी जाऊ नको अर्ध्यात मैफल . .
बघ , तुझ्यासाठीच ओठी गीत आले !

 

देव गुरवाचे किती संतुष्ट दिसती ?
तेल दिवसाचे उभ्या , समईत आले !!

 

तू जरी आलीस उशिरा स्वागताला ,
थेंब गाली केवढ्या घाईत आले !

 

मी कुठे मागायला जाऊ कशाला ?
दान माझे हात धुंडाळीत आले !

प्रतिक्रिया टाका