ही प्रतीक्षा संपण्याचे दीस आले . .

अक्षरगणवृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा
छंदोरचना पृष्ठ क्र. २८४

ही प्रतीक्षा संपण्याचे दीस आले . .
डोळियांनी भेटण्याचे दीस आले !

राहिली आता कुठे ती अंतरेही ?
हात हाती गुंफण्याचे दीस आले !

श्वास घेऊ मो़कळ्या वार्‍यात दोघे
अंतरंगी भारण्याचे दीस आले .

खिन्नता सारी पुसूये चेहर्‍यांनी . .
चुंबने रेखाटण्याचे दीस आले !

अंगणे का साद देती पावलांना ?
नाचताना रंगण्याचे दीस आले !

गूज हे गात्या गळ्यांच्या गोडव्याचे ,
कोकिळेला सांगण्याचे दीस आले

—————————————————————-
लेखनकाल : ०१.०९.१९८९ . नवरात्र – प्रथम दिवस . नंदुरबार
——————————————————————-

प्रतिक्रिया टाका