ही कशी आयुष्य नावाची लढाई ?

अक्षरगणवृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा
छंदोरचना पृष्ठ क्र. २८४

 

ही कशी आयुष्य नावाची लढाई ?
जिंकण्याची केवढी मृत्यूस घाई ?

 

जोवरी ना सूर्य आकाशात आला ,
काजव्यांनो तोवरी, तोवरी मारा बढाई !

 

काल ज्या रस्त्यास मी टाळून गेलो ,
आज तो माझ्याच का वाटेस जाई ?

 

तेथल्या वार्‍यासही स्वातंत्र्य नाही
फूल त्याला हुंगण्याचीही मनाई .

 

दु:ख जे आहे मला ते ह्याचसाठी . .
तोलती पापी इथे माझी भलाई !

 

संपला वस्तीतला ‘ तारा ‘ मघाशी . .
आंधळी गावात आता रोषणाई !

 

प्रतिक्रिया टाका