हीच चर्चा आजही . .
वृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा
( एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त )
हीच चर्चा आजही सर्वत्र होते . .
दु:ख का भेटीत माझ्या मित्र होते !
वास मी घेऊन चुंबत वाचले , ते
दोन पायांच्या फुलाचे पत्र होते !
मरण का यावे तुझ्या त्या अमृताने ?
क्षण पितानाचे म्हणे , अपवित्र होते !
पावलांना माझिया देऊन डोळे ,
दाट अंधारी उभे नक्षत्र होते !
पाहिले ,फसव्या तुझ्या रेखांतुनी मी . .
रंग तू भरता कुणाचे चित्र होते .
भाग्यशालीने असे उघडे पडावे . .
फाटले जे , ते नभाचे छत्र होते !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा