हिर्वं नातं . .

रानाकडे बघताना ,
उन्हाचं स्मित हवं
रानापाशी बोलताना
बन्सीचं गीत हवं . .

 

रानासोबत खेळताना,
झर्‍याचे पाय हवेत . .
रानशब्द झेलताना
वार्‍याचे हात हवेत . .

 

— हिर्वं नातं जोडताना ,
आकाशाचं मन हवं
वणव्यातल्या रानासाठी
डोळ्यांत ओलेपण हवं !

 

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका