हा जरी रस्ता चुकीचा वाटला

 

हा जरी रस्ता चुकीचा वाटला ,
भेटला तो ओळखीचा वाटला !

 

चुंबने ठेवायला गाली तिच्या . .
गुप्त कोनाडा खळीचा वाटला !

 

कोणती छापून आली बातमी . . ?
‘ एक नेता खातरीचा वाटला !  ‘

 

ते तुझे येणे असे मस्तीत की ,
कैफ आम्हां चाहुलीचा वाटला !

 

वाढल्याने झाड माझ्या अंगणी ,
ताप ह्यांना सावलीचा वाटला .

 

वादळाचे पाय दारी लागले !
केर सोन्याच्या धुळीचा वाटला !

 

.

प्रतिक्रिया टाका