हा असा चंद्र
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
रोहिणीची पण ना सोबत रायासाठी !
मेणबत्तीस पुसा त्याग कसा असतो ते . .
जाळणे जन्म ‘ उभा ‘ तिमिर सरायासाठी !
धर्म माझा उशिरानेच कळाला त्यांना . .
लोक नेतात अता राख पुरायासाठी !
श्री. वा. न. सरदेसाई
तरहीसाठी घेतलेल्या श्री सुरेश भट ह्यांच्या गझलेचा मतला :
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !
हा असा चंद्र
श्री. वा . न्. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा