हवा कैफ . .

वृत्त : कर्णफुल्ल

गण : एकूण मात्रा २० ( प प + + )( प = ८  मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू )

 

हवा कैफ दु:खातले क्षण जगाया
कधी पांघरावी उन्हाचीच छाया !

 

तिच्या , माळता फूल . . कानी म्हणालो ,
: फुलाचा नको जायला जन्म वाया !

 

कधीचाच मी , एकटा गात होतो . .
जगाला पुरे तेवढेही हसाया !

 

जशी जाहली भेट प्रेमी जनांची
जळाऊ जनांच्या सुरू कारवाया .

 

कशी याद बघ , राहिली पावलांना . .
तुझे लागले घर अचानक दिसाया !

 

एकूण मात्रा २० ( प प + + )( प = ८  मात्रा .+ म्हणजे निश्चित गुरू )

 

.

प्रतिक्रिया टाका