हवा कैफ दु:खातले क्षण जगाया फायनल
मात्रावृत्त : वंशमणी
लक्षणे :एकूण मात्रा २० ( प प + + ) .+ म्हणजे निश्चित गुरू .प म्हणजे ८ मात्रा .
छंदोरचना पृष्ठ क्र. : ३६३
हवा कैफ दु:खातले क्षण जगाया
कधी पांघरावी उन्हाचीच छाया !
तिच्या , माळता फूल . . कानी म्हणालो ,
: फुलाचा नको जायला जन्म वाया !
कधीचाच मी , एकटा गात होतो . .
जगाला पुरे एवढेही हसाया !
नको मजकडे आज काहीच मागू . .
उरे एक झोळी मला वापाराया !
जशी जाहली भेट प्रेमी जनांची ,
जळाऊ जगाच्या सुरू कारवाया .
कशी याद बघ , राहिली पावलांना . .
तुझे लागले घर अचानक दिसाया !!
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा