हत्तीदा . . .
हत्तीदा रे , हत्तीदा
रोज येतं मनात
विचारू का गंमत
सुपाएवढया कानात ?
असे कसे मागंपुदं
हलतात तुझे कान ?
डोक्यामधे बसवली का
बिजागरे छान ?
दोन-दोन कानाचे
पंखे जरी झुलते
ढेरपोट-अंगाला
हवा कशी पुरते ?
लांबलचक कानाचं
पोतं एके पोतं
नगारा वाजतो तसं
ऐकू का रे येतं ?
कान उपटायची का
आई तुझे रोज ?
लांबी एकदा कानांची
फूटपट्टीनं मोज !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा