स्नो-व्हाइट लॉन्ड्री . .

‘ स्नो-व्हाइट   लॉन्ड्री ‘ चा

मालक कोण ठाऊक आहे ?

लांब टांग , उंच मान

पांढरेशुभ्र बगळोबा हे . . !

 

चिमणे चिमणे , लाजू नको

नखरा तुझा गेला पार

आण तुझी भुरी साडी

मी धुवीन चमकदार !

 

पोपटराव पंचीकर

म्यानिल्याचे काय हाल

अशी कडक इस्त्री करतो

तुम्ही नुसते पाहत रहाल !

 

मोरोपंत मोरोपंत ,

नाचून पोशाख मळून जातो

घाबरू नका,  स्वच्छ धुवून

म्हणाल तेवढी नीळ टाकतो !

 

उचला कपडे कावळोबा ,

येऊ नका कधीकाळी

तुमचे डगले धुता धुता

नदीसुद्धा होईल काळी !

 

 

प्रतिक्रिया टाका