सोनशेंदरी रंगाचे

सोनशेंदरी रंगाचे
तुझे पहाटचे पाय
कळी अल्लड दाखवी
तुझे उमलते वय . .

कसा वार्‍याला लागला
तुझ्या सौंदर्याचा वास
आला वेचत वेचत
तुझे अत्तराचे श्वास . .

प्रतिक्रिया टाका