सूर्योदय…

इथे
कसलेही परिणाम
साधले जात नाही, वा
एखाद्या निर्मिकांचीही
इथे केली जात नाही
वाहवा,
किड्यामुंग्यांप्रमाणे
बचबचणारे सारे,
विषमतेची चादर पांघरून.
पादाक्रांत केली आहेत
सर्व दिशा,भूमी आणि
शेवटही अगदी
समुद्राचा…

पण ,
हे किती दिवस ?
आता तो दिवस झटकत आहे
शतकानुशतकांचा आळस,
अन हुंकार ही देत आहे,
आता…
सारेच निर्मिक ,
कारखाना अन शेताशेताच्या
बांधावरुन देताहेत साद
सर्व शोषितांना,
एकजुट होऊन अन,
करुन भक्कम मुठ
होतोय सुरु एक लॉंगमार्च
तुमच्या आमच्या
सूर्योदयाचा…

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४,
दि,१४-०५-२०१७,पुणे;

———-

प्रतिक्रिया टाका