सावलीला ऊन का चिकटून असते ?

वृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गलगागा

 

सावलीला ऊन का चिकटून असते ?
गोम प्रश्नातच तुझ्या हटकून असते !

 

किलकिली बेचैनशी खिडकी तुझी ती
कूस का बदलीत रात्रीतून असते ?

 

गोड शब्दांना कसे त्यांच्या पटावे ?
कोण माझ्याशी कसे फटकून असते .

 

मी हिशोबाने कशाला जगत राहू ?
श्वास बोटांवर कुणी मांडून असते ?

 

वारलो मी , हे नका सांगू कळीला . .
रोज ती बागेत खोळंबून असते !

 

,

प्रतिक्रिया टाका