सारेच एकतर्फी जेव्हा

मात्रावृत्त : रसना / विनोद द्विरावृत्ता
लक्षणे : गा गालगाल गा+   गा गालगाल गा+  .

+ म्हणजे निश्चित गुरू .

 

सारेच एकतर्फी जेव्हा करार झाले ,
नि:शस्त्र मी तरीही त्यांचे प्रहार झाले !

 

हुंगून कोण गेले , हा कुस्करा कशाचा ?
परडीतल्या फुलाचे नाना प्रकार झाले !

 

आलीस काल – परवा तू राहण्यास येथे
गल्लीत आज तुझिया शायर हजार झाले !

 

ढग येत पावसाचे हलवीत मान गेले
होकार मोसमाचे यंदा नकार झाले !

 

बघताच चांदण्याने सजता तुला मघाशी , ,
कळले न लाजुनी ते कोठे प्रसार झाले . .

 

.

प्रतिक्रिया टाका