सवयीमुळे तर
वृत्त: वल्लभा
गण : गागालगा गागालगा गागालगा गागालगा ( मंदाकिनी ह्या अक्षरगण वृत्ताप्रमाणे )
हजल :
सवयीमुळे तर , हृदयही चोरायला मज येतसे . .
आता न मागे राहती घाईत बोटांचे ठसे !
डोक्यावरी ना शिंग की, मागे न ह्यांच्या शेपटी
अरसिक असे केवळ पशू . . सांगायला ही माणसे .
वाढे जरी शुक्लेंदुवत् ही लोकशाही आमची ,
ही सूज गालांवर हिच्या की , हे निरोगी बाळसे ?
लक्ष्मी कशी चंचल . . तुला वाक्यात एका सांगतो ,
: हाती जसे धरताक्षणी निसटून जाती कवडसे !
ते राजनीतीवर पुन्हा गंभीर बोलू लागता ,
आले मला इतके हसू की, जाहले त्यांचे हसे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा