सर्कशीतली मलं . .
सर्कशीतल्या मुलांची
कापडाची घरं
दोर्यांचे खांब आणि
पडद्यांची दारं . .
सर्कशीतल्या मुलांची
खेळणी तरी कित्ती
उंट वाघ घोडे
नि खरोखरचे हत्ती . .
अस्वल आणि माकड
ह्यांची कोण मज्जा
सलाम करतो मुलांना
जंगलचा राजा . .
बैन्ड सुरू झाला की ,
नाचू लागतात मुलं
हातांत हात गुंफलेली
हारामधली फुलं . .
सर्कशीतल्या मुलांसाठी
वर खाली दिवे
तलम रंगीत कोरे
कपडे नवे नवे . .
सर्कशीतली मुलं किनई
तारेवरून चालतात
आकाशातून पडली तरी
चेंडूसारखी उडतात . .
सर्कशीतली मुलं कधी
भोकाड नाही पसरत
गालात गोड हसायचं
मुळ्ळी नाही विसरत . .
सर्कशीतली मुलं मात्र
जेव्हातेव्हा घाईत
मुंग्यांसारखं रांगेतच
पळायचं माहीत . .
सर्कशीतल्या मुलांची
नसते शाळाबिळा
तिथले सर सांगतात,
रात्रंदिवस खेळा !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा