समोरचे न सैन्य : गझल वा. न. सरदेसाई _ सादरकर्ते श्री .वैराळकर

वृत्त : विभावरी

गण :  लगालगा  लगालगा लगालगा

समोरचे न सैन्य मोजणार मी . .
लढावयास एकटा तयार मी !

कशास शोधशी   मला इथे-तिथे ?
जिथे वसंत तू ,  तिथे बहार मी .

अवर्षणामुळेच वांझ राहिले . .
कसे म्हणू सदोष हे शिवार मी ?

तुझेच गीत  ऐकवी न छेडता ,
अशी जुनीच बाळगी  सतार मी !

धरून ताल  नाचता जरी तुम्ही . .
बनून ढोल सोसतो  प्रहार मी !

प्रतिक्रिया टाका