श्वापद . .

– रानाला
तुम्ही असं
दूर लोटायला नको होतं .
एके काळी
तुम्हीच ना
रानसाली नेसला होता
लज्जारक्षणासाठी ?

 

तुमच्या घरांसाठी
रानानं आपली हाडं दिली .
हिर्वे हिर्वे हात दिले . .
भरभक्कम पाय दिले .

 

तळहातावरच्या फोडासारखं
तुमचं वाड्.मयदेखील
जपून ठेवलं पिढयान् पिढया . .
. . अगदी पानन् पान !

 

रानानं काय दिलं नाही तुम्हाला ?
फळं दिली . . फुलं दिली . .
गवताच्या काडीनंही
कडेवरची दूधपिती
खुडून तान्ही मुलं दिली !

 

देणार्‍यानं द्यावं किती
ह्याचा तरी विचार केलात ?
फक्त माणसाचं श्वापद होऊन
सिमेंटच्या जंगलात गेलात !

प्रतिक्रिया टाका