श्री.वि.ना.उरणकर – डोंबिवली – दिनांक २०/११/१९९०

प्रिय वा.न.

बरेच दिवस तुम्हाला पत्र लिहीन म्हणत होतो.

काल TV वर तुमची नाटिका पाहिली आणि लिहायचे

नक्की केले. एक चांगली नाटिका दिल्याबद्द्ल

अभिनंदन !

वास्तविक मी तुमच्या गझलांचा चाहता.

निरनिराळ्या मासिकांतून आपल्या गझला

दिसल्या की मी त्या आवडीने व बारकाईने

वाचीत असतो. आपल्या ‘सन्मान’ या

गझलेतील काही शेर माझ्या वहीत आहेत . या

गझलचा मतला निव्वळ लाजबाब.

तुम्हाला सर्वप्रकारच्या लेखनात गती आहे .

इतरत्र मोठे यश आपणास लाभो परंतु गझलवरचे

आपले प्रेमही कायम राहो.

आपला

वि.ना.उरणकर

प्रतिक्रिया टाका