श्री.वसन्त जोशी (लेखक ) – कर्जत – दिनांक २३/०२/१९७१

प्रिय श्री सरदेसाई , सादर नमस्ते

आपले १०.१२.१९७० चे नवयुगच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध

झालेल्या ‘वासना’ या कथेबद्दल माझे अभिनंदन करणारे

पोस्टकार्ड नवयुगच्या संपादकांकडून Redirect होउन

परवा मिळले.

काहीही परिचय नसतांना आपण अगत्याने पत्र पाठवून

कथा वाचल्याचे व आवडल्याचे कळविलेत याबद्दल मी

आपला मनापासून आभारी आहे. आपल्यासारख्या रसिक

वाचकांकडून जेव्हा अशी कैतुकाची पत्रे येतात तेव्हा

कसा व किती आनंद होतो म्हणून सांगू ? कारण शेवटी

मी तुमच्यासारख्या वाचकांनाच खरे न्यायाधीश मानतो .

अस्तु.

आपला स्नेहांकित

वसन्त जोशी

प्रतिक्रिया टाका