श्री.भालचंद्र पाठक – ( M.A.,M.Ed.) – बेटावद ता.शिंदखेडे -दिनांक
सन्मित्रप्रवर श्री. वा.न.सप्रेम नमस्कार वि.वि.
नुकतंच तुम्ही सादर केलेलं ‘ पानवलकर’ सरांचे व्यक्तिचित्रण
तुमच्याच मुखातून ऐकलं . लेखन सरस की निवेदन ? असा
संभ्रम पडावा इतकं सुंदर . भाषा सरळ , अनलंकृत आणि
विशेष म्हणजे विलक्षण ओघवती. फारच सुंदर . ऐकतांना
क्वचित कुठे प. लं चे ‘रावसाहेब ‘ डोकावतात असं वाटून
गेलं अतिशय परिणामकारक वाणी-लेखणीचा मास्टरपीस
ऐकल्याच समाधान वाटल .
मागील श्रुंखला नभोनाटयातलं लेखन कौशल्य अप्रतीम .
ती idea खूप नवीन होती . आकाशवाणी काहीवेळा मोठ्या
हिमतीनं चांगले कार्यक्रम सादर करतांना दिसते.
पुनश्च अभिनंदन !
आपला
भालचंद्र पाठक
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा