श्री. प्र.भा.पाठक – धुळे – दिनांक १३/०८/१९८५
श्री.रा.रा.सरदेसाई साहेब यांस
तुम्ही लिहिलेले नभोनाट्य “तू जरा उशिरानेच मावळलास “
जळगाव आकाशवाणीवर ऐकले . एकदम मस्त होते.
त्यानंतर रविवारच्या लोकसत्तामथील तुमचे छोट्यांसाठीचे
पाउसगाणेही वाचायला मिळाले. तेही छान होते. परवा
रविवारच्या महराष्ट्रटाईम्स मथे ” सत्तावीस वजा नऊ “
हा लेख वाचला. खूप आवडला. त्यातील यमके ,प्रास
वगैरे मस्त जमले आहे. हल्लीच्या पद्यतही नुसते
गद्यच असते, पद्य ओषधालाही नसते. याउलट
तुमचा गद्यलेख मात्र पद्यमय होता , काव्यमय होता.
आपला
प्र.भा.पाठक
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा