श्री.दत्ता हलसगीकर (गझलकार ) , सोलापूर , दिनांक २३/०९/२००१

श्री. सरदेसाई, सप्रेम नमस्कार

आज तुमचा ‘आभाळपंख ‘ हा गझल संग्रह

वाचताना क्षणोक्षणी शहारत होतो. तुमची

Maturity त्यातून कळत होती. आजवर दिवाळी-

-अंकातून काही गझला वाचल्या होत्या. त्या

खूप आवडल्या होत्या पण समग्र गझल वाचायला

मिळाली आणि जीवनाचा, सुखदुःखांचा ,

व्यक्तीव्यक्तीतील नात्यांचा , भवतालच्या

साधकबाधक परिस्थितीचा केवढा विचार तुम्ही

संवेदनशील मनान करता आहात हे जाणवलं.

खूप दिवसात इतकं उत्कट सुंदर वाचायला

मिळाल नव्हतं. प्रीतीभावनाही किती हळुवारपणानं ,

कुसुमशीतल मनान तुम्ही प्रगट केली आहे.

एकेक गझलचा शेर म्हणजे सुरेख अर्थवाही

सुभाषितच आहे. 

असं काही वजनदार की उड्यामारत

वाचता येत नाही . थांबून मेंदूला थोडा 

धक्का द्यावा लागतो.

या संग्रहावर लिहाव असं वाटतयं.

निर्दोष आणि परिपूर्ण गझल वाचल्याचा

आज आनंद होतोय.

आपला

दत्ता हलसगीकर

प्रतिक्रिया टाका