श्री. ए.बी.लोहारसर – नाशिक – दिनांक ०३/०९/१९९०
श्री.सरदेसाई , नमस्कार
बर्याच काळानंतर आपले मत्र पाहून तुला आश्चर्य
वाटत असेल पण मला सतत आठवण येते.
परवा दिनांक ०१/०९/१९९० रोजी शनिवारी दुपारी
दूरदर्शनवरील ‘काव्यकुंज ‘ कार्यक्रमात तुझा
सहभाग पाहून खूप आनंद झाला. जुन्या स्मृती
चाळवल्या गेल्या.
खरोखरच तुझ्या दोन्ही गझला व कविता अप्रतिमच
होत्या आणि तुझे सादरीकरणही कार्यक्रमातलील
सर्वात उजवे सादरीकरण होते. यासाठी ,
तुझे खूपखूप अभिनंदन ! सर्वच क्षेत्रातील तुझे
यश पाहून माझा मित्र म्हणून मला खूप अभिमान
वाटतो. परत एकदा अभिनंदन !
तुझाच
ए.बी.लोहार
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा