श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक ०९/१०/१९९७

सह्रुदयी श्री.वा.न.सरदेसाई

मी ३१/०७/१९९७ ते ०९/०८/१९९७ पर्यंत मुंबईला

होतो. मुंबईतील गझल शिबिरात तुम्ही मनाने

सहकार्य केलेत.

मी तुम्हाला सुह्रुद – सुह्रुदय संबिधिले आहे ते

उगीच नव्हे . तुमच्या स्वभावात न आटणारा

आपुलकीचा झरा आहे . निखासता आहे.

very very plain by Heart आहात तुम्ही

आणि तशीच तुमची गजलकलम आहे. तुमच्या

गझलांमध्ये मुलायमपणा आहे.

 

त्या दीर्घ भाषणांचा सारांश सांगताना

माझाच शेर त्यांच्या ओठांवरून गेला 

ढाल पाठीस आहे तरी

अंग का चोरती कासवे

प्रतिमा आणि प्रतीक सुयोग्य आहे.

थांब टोचू लागली नखे आता

एवढे कुरवाळणे बरे नाही !

एका क्षणात वस्ती का बेचिराख झाली ?

तोंडून शब्द त्यांच्या जळता निघून गेला.

साराशचा मतला अतिसुसंगत आहे.

म्हणून तुमच्या गझल कलमला प्रणाम

आपला

आनंदकुमार आडे

प्रतिक्रिया टाका