शेवटी व्हायचे तेच झाले !

वृत्त  : भामिनी

लक्षणे  : गालगा गालगा गालगा गा

 

शेवटी व्हायचे तेच झाले !

ओळखीने नव्या पेच झाले !

 

बोलल्यावीण संवाद झाला

शब्द जेव्हा इशारेच झाले .

 

लोटले दूर ज्यांना जगाने ,

ते नभातील तारेच झाले !

 

विश्व आले जरी जवळ माझ्या ,

आपले मात्र परकेच झाले !

 

भेटता एक चोरून ठिणगी ,

कोळशांचे निखारेच झाले !

 

जन्मले . . वाढले . . वारले ते

शंभरी होत इतकेच झाले !

 

.

प्रतिक्रिया टाका