विश्वास जरी टाकत होतो . .

अक्षरगणवृत्त : रम्याकृति
गण : गागाल लगागाल लगागा

 

विश्वास जरी टाकत होतो ,
मी कोण तुझा लागत होतो ?

 

तो स्पर्श तुझ्यासोबत होता
मी अंग हळू चोरत होतो !

 

तू टाळत आलीस तरीही ,
स्वप्नात तुझ्या जागत होतो !

 

आतून तुझी ओढ अशी की ,
बाहेरून मी चालत होतो .

 

माझ्या दगडाच्या हृदयी मी ,
हे शिल्प तुझे कोरत होतो !

प्रतिक्रिया टाका