विश्वास केवढा हा
मात्रावृत्त : रसना
विश्वास केवढा हा टाकून बैसलो मी !
त्यांचा सुरा जिव्हारी खोवून बैसलो मी !!
तेव्हा कसे दिसावे मज रंग अंतरीचे ?
रंगीत मुखवट्यांना भाळून बैसलो मी .
अंधार मूक पाही तोंडाकडे कधीचा . .
कोठून ऐन वेळी तेवून बैसलो मी ?
आकाश काय खोटे बोलायचेच नाही ?
पत्थर उगा उरी का ठेवून बैसलो मी ?
घर बांधण्यात माझी अर्धी शिकस्त झाली . .
घर सांधण्यात अर्धा मोडून बैसलो मी !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा