विरत चाललो . . तुटत राहिलो . .

एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : शुद्धकामदा
लक्षणे : लललगालगा गालगालगा

 

विरत चाललो . . तुटत राहिलो . .
अजुनि मी कसा तगत राहिलो ?

 

तुज न पत्र हे उलगडायचे
मन लिहून ते पुसत राहिलो .

 

जग जुन्यांस त्या विसरले जरी ,
नवनव्यांस मी पटत राहिलो !

 

तरुणपण तुझे घन धुक्यापरी
दिवसरात्र मी बुडत राहिलो !

 

बघितली मुखे सतत कोरडी . .
ढग बनून मग झरत राहिलो !

 

मज न ओहटी खटकली कधी
बिनउधाण का हटत राहिलो !

 

..

प्रतिक्रिया टाका