विठ्ठल नाम
सरळ रेखिली ओळ . . . घेऊनी
भक्तिरंग निष्काम
मनावर लिहिले ‘ विठ्ठल ‘ नाम . .
पहिले अक्षर गोल गोमटे
वळण चंद्रभागेचे उमटे
वेलांटीच्या गाभार्याने
साकारे सुखधाम . .
कोरियले दुसरे जोडाक्षर
टाळ घेतले हाती सुस्वर
गजरामधुनी मी आळविला
माझा मेघश्याम . .
तिसरे अक्षर जसे काढले
भावफूल गंधित उलगडले
अंमॄतवाणी वाहुन पु़जला
श्री ‘ विठ्ठल ‘ अभिराम . .
वा. न. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा