वा न सरदेसाईलिखित मराठी दोहे १२ ते २२
वा न सरदेसाईलिखित मराठी दोहे १२ ते २२
ठिणगी एक पुरी पडे , जाळायाला रान !
चुगली एक पुरी पडे , फुंकायाला कान !
ज्ञानी तूच जितेपणी , पण झाल्यावर राख ,
कोण ठरे ज्ञानी बहू ? तो मनकवडा काक !
श्रीमंतापाशी खडा , त्यास हिरा हे नाव
गरिबाहाती जो पडे , त्याला दगडी भाव !
मासा सांगे , ” आमचे , ‘ रत्नाकर ‘ कुळ थोर . . “
शीत टिपाया पण फिरे , घेउनि अपुले पोर !
चंद्रा , अर्धे लपविता , तुझेच फुटते बिंग . .
डाग तुझ्या अर्ध्यावरी , तेच दिसतसे अंग !
सामान्यांच्या स्वागता , दारी मांडव घाल . .
नतमस्तक वेली , लता . . उन्नत वृक्ष विशाल !
साखरेसम भाग्य नसे , रुचीत नसता खोट . .
कैरीला बघ लागुनी , कधी मिठाचे बोट !
काचेच्या पात्रातुनी , बघती होउनि खूष . .
म्हणती मासे , ‘ केवढा हा चंचल माणूस ! ‘
दु:ख हेच की , व्हायची . . ‘ अपुली ‘ डोळ्याआड . .
पिकली पाने पाडते , वार्याकरवी झाड !
मातीच्या पेढीत तू , ठेवी एकच बीज
एकाचे लाखो करी , कोण तिच्याखेरीज ?
‘ चूक वागला की कसा ; योग्य नेमके काय ? ‘
त्याच्या जागी तू तुला , ठेव आणि कर न्याय !
—————————————————————–
सर्व दोहे पहाण्यासाठी यूट्यूब चॅनल
गझला , रुबाया , हायकू , अन्य कविता . . .
Pramod Sardesai
——————————————————————
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा