वार्यास कोणी पकडून घ्यायचे
अक्षरगणवृत्त : इंद्रवंशा
गण : गागालगागा ललगालगालगा ( यति पादांती )
छंदोरचना पृष्ठ क्र. ११२
वार्यास कोणी पकडून घ्यायचे ?
त्यांनी मलाही समजून घ्यायचे !
आहे जरी गैर इथे बरेचसे ,
तू जे बरे ते निवडून घ्यायचे .
ह्या चोरवाटा बुजवायच्या कुणी ?
की , कायद्यांनी बदलून घ्यायचे ?
देता लढा प्राणपणे समोरचा ,
थोडे स्वतःला हरवून घ्यायचे .
सूर्योदयाची बघतेस वाट का ?
आले मनी की , उमलून घ्यायचे !
—————————————-
लेखन दिनांक २४.०९.२००४
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा