वारसा देऊन जावे . .

अक्षरगणवृत्त : मंजुघोषा
गण : गालगागा गालगागा गालगागा

 

वारसा देऊन जावे . . रीत आहे
हे नव्यांसाठी जुन्याचे गीत आहे !

 

का पिऊ पाणी कुण्याच्या ओंजळीने ?
श्रावणाला मीच ओलावीत आहे !

 

दु:ख ठेवाया तिजोरी सोनियाची
सौख्य माझे फाटक्या झोळीत आहे .

 

चांदण्याची वाटते चोरांस भीती . .
चांदण्याला हे कुठे माहीत आहे ?

 

वेचले ते फूल काटेरी निघाले ;
मी सुगंधालाच आता भीत आहे !

 

 

.

प्रतिक्रिया टाका