वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला . . !

समस्यापूर्तीसाठी दिलेली ओळ 

वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला . . !

खादीचा अतिशुभ्र अंगिं डगला , टोपी शिरीं देखणी

हस्तीदंति सुहास्य पेरित  फिरे हा पांच वर्षातुनी

कोठेही घुसतो कुठूनहि ,वदे – ‘ सेवेता आम्हां रुची ! ‘

भाषा गोड अतीव ओघवतिही आश्वासनी निस्तुला

वाटे , हा जणुं अमृतासि पिउनी पृथ्वीवरी पातला  . . !

प्रतिक्रिया टाका